Thursday, May 2, 2024
Homeजळगावविद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर निवडणूकीत 49 टक्के मतदान

विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर निवडणूकीत 49 टक्के मतदान

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) अधिसभेवर (assembly)नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून (election) द्यावयाच्या दहा जागांसाठी रविवार दिनांक २९ जानेवारी रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७ मतदान केंद्रावर एकुण सरासरी ४९ टक्के मतदान (voting) झाले.    

- Advertisement -

 दहा जागांसाठी २७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. खुल्या संर्वगात ५ जागांसाठी ११ उमेदवार, इतर मागास संर्वगात एका जागेसाठी ३ उमेदवार, अनुसूचित जाती संर्वगात एका जागेसाठी ४ उमेदवार, अनुसूचित जमाती संर्वगात एका जागेसाठी २ उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगात एका जागेसाठी ३ उमेदवार आणि महिला संर्वगात एका जागेसाठी ४ उमेदवार उभे आहेत. 

            एकुण २२ हजार ६६३ मतदारांची नोंदणी झाली होती पैकी ११ हजार १३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रांवरील ६० बुथवर एकुण सरासरी ४९ टक्के एवढे मतदान झाल्याची आकडेवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाली. सर्वत्र मतदान शांततेत झाले. सकाळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी भुसावळ येथील पी. ओ. नहाटा महाविद्यालय, जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय आणि विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीमधील मतदान केंद्राना भेट देवून पाहणी केली

प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी एरंडोल, पारोळा,धुळे, शिरपूर, अमळनेर येथील मतदान केंद्रांना तर कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव येथील मतदान केंद्राना भेटी देवून मतदानाचा आढावा घेतला. वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील यांनी धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, साक्री येथील केंद्रांना भेटी दिल्या. सर्व मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त होता. ज्या केंद्रांवर काही अडचणी आल्या त्याचे तात्काळ निराकरण करण्यात आले. ९ विभागीय अधिकारी, ८ क्षेत्रीय अधिकारी, ६० केंद्राध्यक्ष आणि ३७० मतदान अधिकारी व मतदान सेवक यांनी या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. 

            बुधवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.  सकाळी दहा वाजेपर्यंत सरासरी ९ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत २४ टक्के तर दोन वाजेपर्यंत सरासरी ३७ टक्के मतदान झाले होते. अशी माहिती कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी दिली. 

सायंकाळी मतदान संपल्यानंतर प्राप्त झालेली केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे  

जळगाव जिल्हा 

१.        कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (२१ टक्के)  

२.        मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव  (४० टक्के )  

३.        पी.ओ. नहाटा महाविद्यालय, भुसावळ ( ४३ टक्के)  

४.        कला, वाणिज्य व मनोहरशेठ धारिवाल विज्ञान महाविद्यालय, जामनेर (७८ टक्के )  

५.        श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर(८० टक्के )  

६.        बोदवड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड (५७ टक्के) 

७.        धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर (३७ टक्के)  

८.        ज.जि.म.वि.प्र.चे कला, वाणिज्य व विज्ञान महा., यावल (५४ टक्के) 

९.        रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे महाविद्यालय, रावेर(५३ टक्के) 

१०.    प्रताप महाविद्यालय, अमळनेर (५३ टक्के)  

११.    डी. एस. पाटील महाविद्यालय, एरंडोल (४३ टक्के)  

१२.    प.रा. हायस्कूल सोसा.चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव (३७ टक्के) 

१३.    कि.वि.प्र.संस्‍थेचे किसान कला, वाणिज्य व विज्ञान महा.,पारोळा (४८ टक्के) 

१४.    एम. एम. महाविद्यालय, पाचोरा (६४ टक्के)  

१५.    सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महा., भडगाव (७९ टक्के)  

१६.    बी.पी. कला, एस.एम.ए. विज्ञान व के.के.सी. वाणिज्य महा., चाळीसगाव (६८ टक्के) 

१७.    महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महा., चोपडा (५१ टक्के) 

धुळे जिल्हा 

१८.    झेङ बी. महाविद्यालय, धुळे (३६ टक्के) 

१९.    व्ही. व्ही. एम संस्थेचे महाविद्यालय, साक्री (३१ टक्के) 

२०.    एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर( ५२ टक्के)  

२१.    एस. एस. व्ही. पी. एस. संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, शिंदखेडा(५५ टक्के) 

२२.    श्रीमती पी.बी. बागल कला व वाणिज्य  महाविद्यालय, दोंडाईचा (५९ टक्के)  

नंदुरबार जिल्हा 

२३.    जी. टी. पी. महाविद्यालय, नंदुरबार (४६ टक्के) 

२४.    श्री.सु.व्हि.नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर (४५ टक्के )  

२५.    पुज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा (५४ टक्के)  

२६.    कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळोदा (६३ टक्के) 

२७.    कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा (४७ टक्के) 

- Advertisment -

ताज्या बातम्या