Sunday, May 19, 2024
Homeजळगाव४९ हजार केळी उत्पादकांना ५४ कोटींची भरपाई मिळणार - डॉ.विवेक सोनवणे

४९ हजार केळी उत्पादकांना ५४ कोटींची भरपाई मिळणार – डॉ.विवेक सोनवणे

मुक्ताईनगर  Muktainagar

जून महिन्यात जिल्ह्यात वादळी पावसामुळे नुकसान (Storm damage) झालेल्या ४९ हजार शेतकऱ्यांना (farmers)  पंतप्रधान फळ पिक विमा (Prime Minister’s Fruit Crop Insurance) अंतर्गत विमा काढलेल्या शेतकऱ्यांना  चार महिन्यापासून प्रलंबित विमा रक्कम (Insurance amount)  जमा व्हावी म्हणून स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे (Swabhimani District President Dr. Vivek Sonwane)यांनी मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले होते.त्या अनुषंगाने लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होण्यास (insurance amount starts) सुरुवात झालेली असून ४९ हजार ६६६ शेतकऱ्यांना ५४ कोटी ३ लाख १४ हजार  रुपये मिळणार आहेत. 

- Advertisement -

बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍यास सात वर्षांची शिक्षा

जिल्ह्यात केळी हे प्रमुख पीक असून मागील काही वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे त्या अनुषंगाने शेतकरी दरवर्षी फळ पिक विमा काढत असून आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने विमा कंपन्यांनी पिडित शेतकऱ्यांना शासनाने आदेशित केलेल्या वेळेच्या आत मदत करणे बंधनकारक आहे. परंतु महाराष्ट्रासह जिल्ह्यात पिक विमा कंपन्यांचा अत्यंत वाईट अनुभव शेतकऱ्यांना वेळोवेळी येत आहे.

मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

 यावर्षी जून महिन्यात वादळी वाऱ्यात हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले त्याची मदत शासन निर्णयानुसार विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना नुकसानीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असून सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांना चक्रीवादळ  नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते.परंतु राजकीय उदासीनता व जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे.

पिक विमा देण्याच्या कालावधी उलटून चार महिने झाल्यानंतरही सुस्त जिल्हा प्रशासन व निगरगठ्ठ विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत देण्यास तयार  नव्हती.यामुळे विमा कंपन्यांच्या  निषेधार्थ  विम्याची रक्कम मिळावी म्हणून काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून सुस्त जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधले होते त्या अनुषंगाने विमा कंपन्यांनी ४९ हजार  नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे.त्यामुळे डॉ. विवेक सोनवणे यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

VISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

- Advertisment -

ताज्या बातम्या