Friday, May 3, 2024
Homeनगरराज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना 5 अब्ज 16 कोटीची थकहमी मंजूर

राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना 5 अब्ज 16 कोटीची थकहमी मंजूर

सुखदेव फुलारी

नेवासा –

- Advertisement -

गाळप हंगाम 2020-21 करीता राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून एकूण 5 अब्ज 16 कोटी 30 लाख रुपयांचे

अल्पमुदत कर्ज घेण्यास शासन शासनहमी मंजूर करण्यात आली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील कोपरगाव, कुकडी, वृद्धेश्वर, प्रवरा या चार साखर कारखान्याचा समावेश आहे.

साखर आयुक्त यांनी गाळप हंगाम 2020-21 साठी दर्शविलेले अंदाजित गाळप विचारात घेऊन राज्यातील 32 सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून एकूण रु. 516.30 कोटी अल्पमुदत कर्ज घेण्यासाठी व त्यावरील व्याजास शासन हमी देण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दि.22 सप्टेंबर व व दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे . त्यानुषंगाने 32 सहकारी साखर कारखान्यांना शासन हमी देण्यात आली आहे.

या 32 सहकारी साखर कारखान्यांना ( ऋणको ) त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेल्या रकमेनुसार एकूण रु.516.30 कोटी ( रु.पाचशे सोळा कोटी 30 लाख फक्त ) इतके अल्पमुदत कर्ज बँकांकडून ( धनको ) थकहमीद्वारे घेण्यास (व्याज अंतर्भूत करुन ) व सदर थकहमीद्वारे घेतलेले कर्ज दि.30 सप्टेंबर 2021 पूर्वी व्याजासह वसूल होईल या अटीवर मान्यता देण्यात आली आहे . सदर शासन हमीची मुदत दिनांक 30।सप्टेंबर 2021पर्यंत राहील.

* अल्प मुदत कर्जाला थकहमी देताना शासनाने साखर कारखान्यांना घातलेल्या अटी अशा…..

* अल्पमुदत कर्ज बँकांकडून (धनको) थकहमीद्वारे घेण्यास ( व्याज अंतर्भूत करुन) व सदर थकहमीद्वारे घेतलेले कर्ज दि.30 सप्टेंबर 2021 पूर्वी व्याजासह वसूल होईल या अटीवर मान्यता देण्यात येत आहे.

* सदर शासन हमीची मुदत दि.30 सप्टेंबर 2021 पर्यंत राहील.

* करारनाम्याशिवाय किंवा करारनामा स्वाक्षरीत होण्यापूर्वी बँकेने कर्जाचे वितरण केल्यास शासन हमी अवैध ठरेल.

* सदर शासन हमी प्रत्येक कारखान्याच्या नावासमोर दर्शविलेल्या कर्जाच्या रकमेपुरती ( व्याज अंतर्भूत करुन ) मर्यादित राहील

* थकहमी दिलेल्या कारखान्यांनी आपले कार्यक्षेत्रातील संपुर्ण उस गाळप होईपर्यंत कारखाना सुरु ठेवणे बंधनकारक राहील.

* धनकोने कारखान्यांना मंजूर केलेल्या कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक करारपत्रात नमूद करावे.

* सदर साखर कारखान्यांनी शासन हमीवर घेतलेल्या कर्जाचा वापर कर्ज ज्या प्रयोजनासाठी घेतले आहे त्यासाठीच करणे बंधनकारक राहील .

* साखर कारखाने प्रमुख ऋणको राहतील .

* संबंधित कारखान्यास शासनाचे पुर्व परवानगीशिवाय सदर प्रयोजनासाठी अन्य कोणतेही कर्ज उभारता येणार नाही.

* साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाची सामुहिक हमी ठरावाद्वारे घेण्यात यावी .

* बँकेच्या कर्ज मंजूरीपत्रातील सर्व अटी व शर्ती कारखान्यांवर बंधनकारक राहतील .

* बँकेच्या नियमानुसार अल्पमुदत कर्जाची परतफेड टॅगिंग केलेली मालमत्ता जसजशी विक्री होईल. त्याप्रमाणात थकहमीची रक्कम कमी होत जाईल.

* शासन थकहमी देतांना गळीत हंगाम निश्चितपणे सुरु करण्याची व त्यावर संनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी साखर आयुक्तालय व संबंधित बँकेच्या क्षेत्रिय यंत्रणेची राहील .

* धनको कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाल्यास त्याकरीता आकारण्यात आलेल्या दंडनीय व्याजाकरीता किंवा इतर कोणत्याही देय रकमेसाठी शासन हमी लागू होणार नाही.

* कर्जाच्या परतफेडीबाबत होणार्‍या कसूरीची सुचना शासनास 30 दिवसांच्या आत देणे संबंधित धनकोला बंधनकारक राहील .

* धनकोने संबंधित कारखान्याकडून कर्ज वसुलीसाठी वरील सर्वतोपरी प्रयत्न केल्याशिवाय धनकोला हमी पूर्ततेकरीता शासन हमीचा प्रतिभूती म्हणून वापर करता येणार नाही . संबंधित कारखान्याच्या चल/ अचल मालमत्तेची विक्री अथवा लिलाव करुन वसुली करण्याचा निर्णय धनकोने घेतल्यास, त्याकरीता एक समिती गठीत करण्यात यावी व या समितीमध्ये सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि वित्त विभागाचा प्रत्येकी एक प्रतिनिधीचा समावेश करण्यात यावा. विक्री प्रक्रियेचे अंतिमीकरण शासनाच्या मान्यतेने करण्यात यावे.

* कोणत्याही अटीचा भंग झाल्यास शासन हमी अवैध होईल.

* साखर कारखाने हे प्रिन्सीपल डेब्टर राहतील.

* शासन हमीवरील देण्यात येणार्‍या कर्जाची रक्कम व्याजासह कोणत्याही परिस्थितीत रु.250 प्रतिक्विंटल साखर विक्रीवर प्रथम प्राधान्याने टॅगिंग करुन साखर कारखान्यांकडून दि.30 सप्टेंबर 2021 पूर्वी वसूल केली जाईल असे हमीपत्र संबंधित बँकांकडून कर्ज वितरणापूर्वी साखर आयुक्तांनी घ्यावे .

* थकहमी दिलेल्या साखर कारखान्यांनी उस पुरवठादार शेतकर्‍यांना ऋठझ ची रक्कम वेळेवर अदा करण्याची दक्षता घ्यावी. यासाठी या कारखान्यांकडून साखर आयुक्त यांनी हमीपत्र घ्यावे व सदर साखर कारखाने उस पुरवठादार शेतकर्‍यांना ऋठझ ची रक्कम वेळेवर देतील यावर देखरेख ठेवावी.

अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी शासन हमी

मिळालेले सहकारी कारखाने व कर्ज रक्कम

अक्र. साखर कारखान्याचे नाव कर्जाची रक्कम

(कोटी रु.)

1) सहकारमहर्षि कोल्हे कोपरगाव 18.22

2) कुकडी श्रीगोंदा 18.00

3) श्री वृध्देश्वर पाथर्डी 10.87

4) डॉ. विखे पा. प्रवरानगर 23.84

5) लो.सोळंके धारुर (बीड) 19.62

6) रेणुकादेवी शरद पैठण 04.75

7) वैद्यनाथ परळी (बीड) 16.56

8) जयभवानी गेवराई (बीड) 09.72

9) मोहनराव शिंदे आरग (सांगली) 18.26

10) कुंभी-कासारी करवीर (कोल्हापूर) 26.30

11) डॉ. किसन अहीर वाळवा (सांगली) 18.13

12) भाऊराव चव्हाण युनिट 1.नांदेड 15.81

13) भाऊराव युनिट2 जि. हिंगोली 08.51

14) टोकाई कुरुंदा ता. वसमत (हिंगाली) 05.39.

15) विघ्नहर पुणे 24.00

16) रावसाहेब पवार घोडगंगा शिरुर 20.27

17) श्री छत्रपती भवानीनगर (पुणे) 28.42

18) निराभिमा इंदापूर (पुणे) 15.40

19) राजगड भोर, जि. पुणे 10.00

20) किसनवीर खंडाळा जि. सातारा 11.60

21) किसनवीर सातारा वाई (सातारा) 18.98

22) श्री विठ्ठल साई उमरगा (उस्मानाबाद) 10.85

23) डॉ. आंबेडकर केशेगाव (उस्मानाबाद) 22.08

24) श्री विठ्ठल गुरसाळे ता. पंढरपूर (सोलापूर) 30.96

25) श्री संत दामाजी मंगळवेढा (सोलापूर) 10.58

26) स.म.शं.मोहितेपाटील अकलूज (सोलापूर) 33.24

27) श्री रामेश्वरजालना 09.33

28) अंबाजोगाई जि.बीड 09.72

29) श्री संत मारुती महाराज औसा (लातूर) 07.00

30) संत कुर्मदास माढा , जि .सोलापूर 05.15

31) भीमा मोहोळ जि. सोलापूर 20.22

32) वसंतराव काळे पंढरपूर जि. सोलापूर 14.52

एकूण 516.30

- Advertisment -

ताज्या बातम्या