Saturday, August 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविना परवानगी झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड

विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

- Advertisement -

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ मधील कलम ४ मध्ये करण्यात येऊन अध्यादेश काढण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २२ ऑगस्ट २०२६ – डिजिटल दाव्यांचा दप्तरी झोलझाल!

0
केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि डिजिटल क्रांतीचा डांगोरा पिटला जात आहे. सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी ‘डीबीटी’...