Friday, May 3, 2024
Homeजळगावरावेर बाजार समितीत १८ जागांसाठी ५१ अर्ज

रावेर बाजार समितीत १८ जागांसाठी ५१ अर्ज

रावेर raver प्रतिनिधी

बाजार समितीच्या (Raver Bazar Committee) सार्वत्रिक निवडणुकीची (general election) रणधुमाळी जोरात सुरु आहे. दि.२० माघारीची शेवटची मुदत असल्याने १८ जागांसाठी (seats) ५१ अर्ज (applications) उरले आहे. यामुळे मोठी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरले होते.मात्र माघार घेतल्याने,या निवडणुकीत पहिल्या फळीतील एक/दोन उमेदवार सोडून दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची जास्त संख्या आहे.एकूण १५१ अर्ज दाखल झाले होते.त्यातील १०० उमेदवारांनी माघार (Candidates withdraw)घेतली आहे.  

- Advertisement -

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत होणार तिरंगी लढत

रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माघारी नंतर खरे चित्र स्पष्ट झाले आहे.यात भाजप-शिंदे गट पुरस्कृत पॅनल विरोधात महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल अशी लढत यावेळी होत आहे.तर तिसरी आघाडी देखील किल्ला लढवत आहे.

माघारीनंतर विकासो सेवा सहकारी सर्वसाधारण मतदार संघात (कंसात माघारी आधीचे उमेदवार) ७ जागांसाठी २३ (५३) उमेदवार रिंगणात आहे.

महिला राखीव मतदार संघात दोन जागांसाठी ४ (१६),इतर मागासवर्गीय मतदार संघात एका जागेसाठी २ (१०),

भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघात एक जागेसाठी ५ (९), ग्रा.प.सर्वसाधारण दोन जागांसाठी ६ (१८),ग्रा,प,अनुसूचित जाती जमाती मतदार संघात एक जागेसाठी ३ (८),आर्थिक दुर्बल मतदार संघात एका जागेसाठी ३ (८),

व्यापारी मतदार संघात दोन जागांसाठी ४ (१४),हमाल मापाडी मतदार संघात एका जागेसाठी २(६) दाखल आहे.

यात सोसायटी जनरल मतदार संघात माजी सभापती निळकंठ चौधरी,श्रीकांत सरोदे,विपिन राणे,जिजाबराव चौधरी,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,भाजप युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील,केऱ्हाळे ग्रा.प.सदस्य चंद्रकांत पाटील,महिला राखीव मतदार संघातून राष्ट्रवादीच्या सावदा नगरसेविका रेखा वानखेडे,रावेर माजी नगरसेविका छाया महाजन,शकुंतला महाजन,माजी जि.प.सदस्या कोकिला पाटील,व्यापारी मतदार संघात किशोर गनवाणी,माजी जिप सदस्य रमेश पाटील,माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील यांनी माघार घेतली आहे.

निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी विजयसिंह गवळी,सहा.अधिकारी नायब तहसीलदार संजय तायडे त्यांच्या देखरेखीखाली पार पडली.माघारीसाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व भाजपचे पदाधिकारी तळ ठोकून होते.

आज चिन्ह वाटप.

माघारीनंतर महाविकास आघाडी व भाजप शिंदे गटाने पॅनल मधील सर्व उमेदवारांसाठी एकच चिन्हांची मागणी केली आहे.आज चिन्ह वाटप होणार असून, त्या नंतर उमेदवार ताकदीने प्रचाराला लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या