
मानूर | वार्ताहर
कळवण आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत कनाशी येथील आश्रमशाळेतील तब्बल ५१ विद्यार्थीनी अस्वस्थ झाल्याने त्यांना कनाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असून सर्व विद्यार्थीनींवर उपचार सुरू असून चार विद्यार्थीनिंची प्रकृती थोडी नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
काल पासून कनाशी येथील आश्रमशाळेतील बऱ्याच विद्यार्थीनींना ताप थंडी जुलाब तसेच खोकल्याचा त्रास होत होता कनाशी येथील आश्रमशाळेतील ५१ मुलींना कालपासून ताप,थंडी, जुलाब, खोकला वगैरे आजाराने ग्रस्त होऊन मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागल्याने अन्न सेवनातून किंवा दूषित पाण्याने हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आदिवासी आश्रमशाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून कळवण तालुक्याशेजारील बागलाण तालुक्यातुन अन्न पुरवठा केला जातो. हा अन्नपुरवठा निकृष्ट असल्यामुळे मुली आजारी पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आमदार नितीन पवार यांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कनाशी येथे जाऊन विद्यार्थची विचारपूस करीत धीर दिला. यावेळी आमदार पवार यांनी प्रकल्प अधिकारी अकुनरी नरेश यांच्याशी फोनवर संपर्क साधून आरोग्य विभागाच्या यंत्रणेला बोलावून त्वरित तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु प्रकल्प अधिकारी अंकुनुरी नरेश यांना माहिती दिल्यानंतर सुद्धा प्रकल्प अधिकारी दीड तासांनी कनाशी येथे हजर झाले त्यामुळे प्रकल्प अधिकारीना आदिवासी विद्यार्थीच्या प्रकुर्ती बद्दल काही देणे नसून त्यांना याचे गांभीर्य नसल्याने निर्दर्शनास आले.
दरम्यान, कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत बागलाण तालुक्यातून अन्न पुरवठा होतो त्यामुळे लवकर शिजविलेले अन्न उशिरा पोहचत असल्याने अन्न खराब होत आहे व तेच अन्न विदयार्थ्यांना दिले जात असल्याने असे प्रकार समोर येत आहे.तरी यावर त्वरित उपाययोजना करून विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक व ताजा अन्न पुरवठा करावा अशी मागणी तालुक्यातील आदिवासी जनतेने केली आहे.
५१ मुलींपैकी ४ मुलींवर आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून ४७ मुलींवर उपचार करून त्यांना आश्रमशाळेवर सोडण्यात आले आहे. तसेच आश्रम शाळेतील अन्नाचे व पाण्याचे नमुने घेतले असून ते तपासणी साठी पुढे पाठविण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यावर पुढील निदान कळेल कि अन्नातून विषबाधा झाली आहे कि पाण्यातून अद्याप परिस्थिती नियंत्रणात असून उपचार सुरु आहेत.
डॉ. बागुल; कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्र




