Friday, May 3, 2024
Homeनाशिक५९ लाखांच्या मद्यासह ट्रक लांबविला; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना

५९ लाखांच्या मद्यासह ट्रक लांबविला; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना

सिन्नर । प्रतिनिधी

फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत सुमारे 59 लाख 43 हजार 715 रुपये किमतीच्या विदेशी दारूसह 12 टायर ट्रक लांबविल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे नजीक घडली. या घटनेत चोरट्यांनी ट्रकचा ड्रायव्हर आणि ्निलनरचे हातपाय बांधून डोंगरावर सोडून पलायन केले…

- Advertisement -

शनिवारी (दि.13) रात्री 9 वाजेच्या सुमारास दिंडोरी येथील युनायटेड स्पिरीट कंपनीतून चालक लखन बुधा पवार रा. साक्री, जि. धुळे यांनी आपला 12 टायर असलेला ट्रक (क्र. एमएच 18, एए 8867 ) मध्ये मॅकडॉवेल कंपनीचे सुमारे 59 लाख 43 हजार 715 रुपये किमतीचे 950 बॉक्स घेऊन चाकणच्या दिशेने निघाले होते.

त्यांच्यासोबत ्निलनर राजु पवार हे होते. रात्री 11 वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरून ट्रक जात असतांना नांदुरशिंगोटे जवळ पाठीमागून आलेल्या सफेद रंगाच्या चारचाकी गाडीतील एकाने हातातील कागद दाखवत ट्रक थांबविण्यास सांगितला. त्यामुळे ड्रायव्हर पवार यांनी ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला.

गाडीतून सात जण खाली उतरले तसेच आम्ही फायनान्स कंनीचे कर्मचारी असून ट्रकचेे तीन हप्ते थकलेले असल्याने ट्रक कंपनीच्या गोडाउनला जमा करणार असल्याचे सांगितले. याबाबत चालकाने फोनवरून मालक रामा आव्हाळे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील एकाने फोन हिसकावून घेत एकजण ट्रक ताब्यात घेऊन निघू लागला.

ट्रक हलविण्यास मज्जाव केल्यानंतर उरलेल्या सहा जणांनी ्निलनर आणि ड्रायवर यांना मारहान करून चारचाकी गाडीत कोंबले.

त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून कापून टाकु असा दम भरत गाडी सुरू केली. सुमारे अर्धा तासानंतर सुनसान डोंगरावर नेत हातपाय दोरीने बांधून तसेच तोंडाला चिगटपट्टी लावत दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देत पोबारा केला. यानंतर चालक लखन पवार याने कशीबशी सुटका करून घेत डोंगराच्या खाली उतरून परीसरातील एका घरी जात आपबिती सांगितली.

त्यानंतर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत ्निलनरचा शोध घेतला. ्निलनर बांधलेल्या अवस्थेत सापडून आल्यानंतर त्याची सुटका करून वावी पोलीस ठाण्यात संपर्क केला. घटनेची काहीती मिळताच वावी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ट्रक ड्रायव्हर आणि ्निलनर यांच्याकडून माहीती घेत लागलीच तपासाची चक्रे फिरविली.

घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबेे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी चालक लखन पवार याच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात सात अज्ञात चोरट्यांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास काळे हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या