Friday, May 3, 2024
Homeनाशिक'बागलाण ब्रँडी' हाऊसच्या संचालकाची आत्महत्या

‘बागलाण ब्रँडी’ हाऊसच्या संचालकाची आत्महत्या

लोहोणेर | वार्ताहर

सटाणा शहरातील बागलाण ब्रँडी हाऊसचे संचालक हरीश गोवर्धनदास माखिजा ( वय ६२ ) या व्यक्तीचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली…

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, गिरणा नदी पात्रात पुलावरून सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान माखीजा यांनी अज्ञात कारणावरून उडी मारल्याची घटना घडली.

घटनेची माहिती पोलीस यंत्रणा आणि स्थानीक प्रशासनाला तत्काळ देण्यात आली. घटनास्थळी देवळा पोलीस यांच्यासह यंत्रणा दाखल झाले असतानाच अंधारामुळे शोधकार्यास अडथळा होता. यामुळे तपासकार्य थांबविण्यात आले होते.

आज पहाटेला पुन्हा एकदा शोधकार्य हाती घेण्यात आले. यादरम्यान, ठेंगोडा पाणीपुरवठा परिसरात हा मृतदेह आढळून आला.

आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आज सकाळी त्यांचा मृत्यूदेह गिरणा नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.

याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या