धुळे/प्रतिनिधी – dhule
शहरातुन गुटख्याची तस्करी करुन वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकास पोलिसांनी पकडले असून ट्रक सह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड (police) पोलिसांनी ही कारवाई केली.
मालेगावकडुन (malegaon) जळगावकडे ट्रकमधून (क्र.एम एच १५ जी व्ही ९७४१) विमल पान मसाला व तंबाखु जन्य पदार्थ भरुन जात
असल्याची गुप्त माहिती सपोनि संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्यासह पथकाने काल रात्री हॉटेल द्वारका लॉज समोर सापळा रचला. थोडया वेळाने मालेगांवकडुन संशयीत ट्रक येतांना दिसल्याने पोलीसांनी मालट्रक थांबविण्याचा इशारा केला. परंतु चालकाने पोलीस असल्याचे पाहुन ट्रक न थांबविता पळून गेला.
ट्रकचा पाठलाग करुन (Mumbai-Agra Highway) मुंबई-आग्रा महामार्ग लगत हॉटेल इस्लामी ढाब्याजवळ रात्री साडेअकरा वाजता पकडले. ट्रकवरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने शेख हारुन शेख हुसेन (वय ४८, रा.गल्ली नं ९ आझादनगर, मालेगाव जि.नाशिक) असे सांगितले. तर क्लिनरने त्याचे नाव मोहम्मद समील मोहम्मद सलीम (वय १९,रा.कमालपुरा मालेगाव) असे सांगुन ट्रकमध्ये मालाबाबत विचारले असता ते उडवा उडवीचे उत्तरे देत होते.
त्यामुळे ट्रकवर चढून ताडपत्री उघडुन पाहीले असता त्यात खाकी रंगाचे कार्टून व सफेद रंगाच्या गोण्या सुगंधीत पान मसाल्याचा सुगंध येत असल्याने उघडून पाहिले असता संबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला.





