Thursday, September 10, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : तेरा हजार व्हिडिओ डिलीट; SIT कडून दोन गुन्ह्यांचे...

Ashok Kharat Case : तेरा हजार व्हिडिओ डिलीट; SIT कडून दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि भक्तांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या स्वयंघोषित अशोक खरात (Ashok Kharat) याच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, एसआयटीच्या सायबर टीमने (Cyber Team) पीडितांच्या सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या तब्बल १३,१७५ आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक्स इंटरनेटवरून हटवल्या. तसेच वारंवार अशा पोस्ट टाकणारी ४५१ सोशल मीडिया खाती कायमस्वरुपी बंद केली आहेत.

- Advertisement -

एसआयटीच्या तपासात खरातच्या गुन्ह्यांची कार्यपद्धती समोर आली आहे. संशयित खरात हा पीडित व्यक्तींच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना मृत्यूची भीती दाखवत होता. खडे, चिंचुके, रूद्राक्ष आणि बनावट पूजाविधींच्या लोकांकडून पैसे उकळत होता. तर, ईशानेश्वर माध्यमातून तो मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेऊन तो बनावट नाग दाखवून हातचलाखीने चमत्कार करत असल्याचे भासवत होता. महिलांना (Women) दैवी शक्तीची भीती दाखवून आणि बदनामीची धमकी देऊन त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्यांचा डोंगर, १०५ साक्षीदार

अशोक खरातवर नाशिक आणि नगर जिल्ह्यात (Nashik and Nagar District) एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी महिला अत्याचाराचे आठ आणि फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास एसआयटी करत आहे. उर्वरित गुन्हे स्थानिक पोलीस तपासत आहेत. एसआयटीकडे एकूण ११ गुन्हे तपासावर असून १०५ हून अधिक लोकांची चौकशी व साक्ष नोंदविली आहे. मौखिक, भौतिक, दस्तऐवजी आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील भक्कम पुरावे जप्त केले आहेत.

दोषारोपाची प्रक्रिया वेगवान

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे अनिवार्य असल्याने, एसआयटीने आतापर्यंय दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर दर केले आहे. उर्वरित गुन्ह्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खरात हा तब्बल ४९ दिवस एसआयटीच्या कोठडीत होता आणि सध्या तो सिन्नर पोलिसांच्या अटकेत आहे. या कारवाईसाठी २४ पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक अहोरात्र काम करत असून, खरातच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी काही पीडितांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...