Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedजळगाव : जिल्ह्यात विक्री झाली 69 हजार 387 लीटर दारू

जळगाव : जिल्ह्यात विक्री झाली 69 हजार 387 लीटर दारू

जळगाव  – 

दीड महिन्यानंतर मंगळवारी उघडलेल्या जिल्ह्यातील दारू दुकानांवर मद्यपी अक्षरश: तुटून पडल्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील 221 देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने तसेच बियर शॉप्सवर एकूण 69 हजार 387 लीटर दारूची विक्री झाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाली आहे.

- Advertisement -

मंगळवारी सुरू झालेल्या दारू दुकानांवर घसा ओला करण्यासाठी तळीराम अक्षरश: तुटून पडले होते. बुधवारी देखील जिल्हाभरात हेच चित्र सर्वत्र बघावयास मिळाले.

जळगाव जिल्ह्यात असलेल्या 21 वाईन शॉप्स, 99 देशी दारू विक्री दुकाने, तसेच 101 बियर शॉपी अशा एकूण 221 दारू दुकानांवर 69 हजार 387 लिटर दारूची विक्री झाली आहे.

त्यापैकी 35 हजार 48 लिटर देशी, 17 हजार 42 लिटर विदेशी तर 17 हजार 297 लिटर बियरची विक्री जिल्हाभरात बुधवारी झाल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधिक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती, परंपरेचा दिव्य आविष्कार

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी...