Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

​नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. प्रवाशांची लूट आणि महामंडळाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या तब्बल ११ बड्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

यामध्ये वर्ग-१ श्रेणीतील ३ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असून, या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे, नाशिकचे विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, यंत्र अभियंता पंकज महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, आगार व्यवस्थापक (पंचवटी) सौरभ देवरे, लेखा अधिकारी नीलिमा विसपुते, विभागीय लेखा अधिकारी संजय गायधनी, विभागीय भंडार अधिकारी अमोल वाघ, विभागीय कर्मवर्ग अधिकारी अश्विनी चव्हाण, विभागीय अभियंता चैताली भुसारे आणि आगार व्यवस्थापक प्रणव अहिरे, अशी निलंबित केलेल्या अकरा जणांची नावे आहेत.

विशेष म्हणजे, चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण देणे आणि वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे यांच्या अकार्यक्षमतेमुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या काही काळात एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली होती. असे असूनही, नाशिक विभागातील उत्पन्न वाढण्याऐवजी गेल्या दोन हंगामात कमालीचे घटले होते.

हा विरोधाभास उघडकीस आणण्यासाठी १० जून रोजी महामंडळाचे व्यवस्थापक तथा नियंत्रण अधिकारी वीरेंद्र कदम यांनी सांख्यिकी व नियोजन अधिकाऱ्यांसमवेत इगतपुरी आणि नाशिक आगारांना अचानक भेटी दिल्या. या गुप्त तपासणीत अधिकाऱ्यांचा जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा समोर आला. वाहनांचे बेसिक रेकॉर्ड न ठेवणे, चालकांच्या हजेरीवर नियंत्रण नसणे, नादुरुस्त वाहने वेळेत दुरुस्त न करणे आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून विभागाला जाणीवपूर्वक तोट्यात ढकलण्याचा गंभीर कट या अधिकाऱ्यांनी रचल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...