Thursday, May 2, 2024
Homeनाशिकआयमा निवडणुकीसाठी 70 टक्के मतदान

आयमा निवडणुकीसाठी 70 टक्के मतदान

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

अंबड इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात आयमाच्या (AIMA) द्विवार्षिक निवडणुकीसाठी (Election) रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले…

- Advertisement -

मतदारांचा प्रचंड उत्साहामुळे 70 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या सोमवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

आयमाच्या निवडणुकीसाठी (AIMA Elections) उद्योजकांच्या सत्ताधारी गटाचा एकता पॅनल (Ekta Panel) व विरोधी गटाचा उद्योग विकास पॅनल (Vikas Panel) यांच्यात सरळ सामना रंगला होता.

प्रचाराची यंत्रणा अतिशय शांततेत सुरू होती. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर मतदार मतदानाला येतात की याकडे पाठ फिरवतात? याबद्दल शंका व्यक्त केली जात होती.

मात्र सकाळपासूनच मतदानाला उद्योजक मतदारांनी गर्दी केली होती. मतदानाच्या पहिल्या तीन तासांमध्ये पाचशे मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता. आयमा निवडणुकीसाठी एकूण 1 हजार 954 मतदार असून सायंकाळी मतदान संपल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार 1 हजार 377 मतदारांनी मतदानाचा बजावला. प्रत्यक्ष 70.47 टक्के मतदान झाल्याचे चित्र आहे.

किरकोळ कुरबुरीचे प्रसंग वगळता निवडणूक शांततेत पार पडली. निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी डीजी जोशी, विवेक गोगटे, सी. डी. कुलकर्णी लक्ष ठेवून होते.

उद्या मतमोजणी

निवडणुकीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार मतमोजणी ही दि.1 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांची लिखित संमती घेत मतमोजणी सोमवारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या