Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये ७२ शिक्षक, मुख्याध्यापकांना ‘कराेना’

नाशिकमध्ये ७२ शिक्षक, मुख्याध्यापकांना ‘कराेना’

नाशिक | Nashik

शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या केलेल्या कराेना चाचणीत जिल्ह्यातील ७२ शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी कराेनाबाधित आढळले आहेत. तर, शाळा सुरू केल्यानंतर जिल्ह्यात एक लाख २१ हजार ५०० विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये हजेरी लावली

- Advertisement -

जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग ४ जानेवारीपासून सुरु झाले आहेत. एकूण १३२४ शाळांपैकी इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग असलेल्या ८४६ शाळा सुरु झाल्या आहेत. सुरु झालेल्या शाळांमध्ये १ लाख २१ हजार ५७९ विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग असलेल्या शाळा सुरु करण्यापूर्वी ७०६३ मुख्याध्यापक, शिक्षकांची व २५०० शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातील ६२ मुख्याध्यापक, शिक्षक व १० शिक्षकेत्तर कर्मचारी हे कराेना पॉझिटीव्ह आलेले आहेत.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. वैशाली वीर यांनी शासकीय कन्या विदयालय नाशिक येथे उपस्थित राहुन शिक्षक, विदयार्थी व पालक यांना मार्गदर्शन करुन मनोधैर्य वाढविले.

- Advertisment -

ताज्या बातम्या