Tuesday, February 3, 2026
Homeमुख्य बातम्या77th Republic Day 2026 : दिल्लीत कर्तव्य पथावर 30 विविध चित्ररथ, 10...

77th Republic Day 2026 : दिल्लीत कर्तव्य पथावर 30 विविध चित्ररथ, 10 हजार पाहुणे उपस्थित

पंतप्रधान मोदी यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली | New Delhi

आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा (77th Republic Day) केला जात आहे. यानिमित्ताने दिल्लीतील कर्तव्यपथावर लष्करी दलांकडून संचलन केले जात आहे. यावेळी देशातील विविधतेचे दर्शन घडवणारे चित्ररथही कर्तव्यपथावर दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर परेडसाठी कर्तव्य पथावर पोहोचले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Draupadi Murmu), युरोपीय परिषद आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष पारंपारिक बग्गी मधून कर्तव्यपथावर आले. प्रजासत्ताक दिन असल्याने दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत मल्टी-लेयर सिक्योरिटी तैनात आहे.

- Advertisement -

आज भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन (77th Republic Day) आहे. याच दिवशी देशात संविधान लागू झाले होते. कर्तव्य पथावर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पहायला मिळेल. राफेल, सुखोई, जॅग्वार ही फायटर विमानं आपलं कौशल्य सादर करतील. त्याशिवाय देशातील सांस्कृतिक परंपरा आणि सैन्य ताकद यांनी शानदार झलक पहायला मिळेल. कर्तव्य पथासह संपूर्ण दिल्लीत (Delhi) कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10,000 जवान ड्युटीवर तैनात आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष एंटोनियो कोस्टा (European Council President Antonio Costa) आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन (European Commission President Ursula Von Der Leyen) प्रमुख पाहुणे आहेत. हे वर्ष यासाठी सुद्धा खास आहे की, यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. कर्तव्य पथाला भव्यतेने सजवण्यात आले आहे.

YouTube video player

विकसित भारताचा संकल्प अधिक भक्कम होवो – पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रजासत्ताक दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या आन-बान आणि शानचा प्रतीक आहे. हे राष्ट्रीय महापर्व तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवी उत्साह घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प अधिक भक्कम होवो, हीच कामना. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/2015459267072098347

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...