Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत लोकल ट्रेनला आग

मुंबईत लोकल ट्रेनला आग

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम

मुंबई |

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज गर्दीच्या वेळी थरारक घटना घडली. कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांच्या दरम्यान उभ्या असलेल्या कचरा वाहून नेणाऱ्या (गार्बेज स्पेशल) लोकल ट्रेनला अचानक भीषण आग लागली. आगीचे दाट धुराचे लोट आकाशात पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

- Advertisement -

सुदैवाने ही गाडी प्रवासी वाहतूक करत नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवाशांचे झाले आहेत. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवून रेल्वे वाहतूक सुरुळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...