Tuesday, September 29, 2026
HomeनगरAhilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

361 इच्छुकांनी नेले उमेदवारी अर्ज

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. सोमवार (दि. 5) ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करण्यासाठी मुदत असून काल पहिल्याच दिवशी विक्रमी 361 उमेदवार अर्जाची विक्री झाली असून बँकेचे माजी संचालक राहुल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान, एकीकडे जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्जांची विक्री आणि पहिल्याच दिवशी श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघातील इच्छुक आणि ‘बिनविरोध समझोता’ संगमनर येथील बैठकीला गैरहजर असणार्‍या श्रीगोंद्यातील बँकेचे माजी संचालक राहुल जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत नाट्यपूर्ण घडामोडी घडणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी नगर येथील बँकेच्या चाहूराणा शाखेत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कार्यालय थाटण्यात आलेले आहे. या ठिकाणी उमेदवारी अर्जांची विक्री आणि स्वीकृती सुरू झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेवा सोसायटी मतदारसंघातील जिल्ह्यातील 14 तालुक्यांचे 14 मतदारसंघ आहेत. याशिवाय बिगरशेती संस्था, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि महिला राखीव मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची किंमत प्रत्येक मतदारसंघासाठी 100 रुपये निश्चित करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी 2 हजार रुपये अनामत रक्कम राहणार आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी जिल्हा बँकेसाठी 361 अर्जाची विक्री झाली असून जगताप यांच्या रुपाने पहिला उमदेवारी अर्ज दाखल झाला आहे.

महुर्त साधला, लढत राहणार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी निवडणूक अर्ज दाखल केलेले माजी संचालक राहुल जगताप यांच्याशी संपर्क झाला नाही. मात्र, रविवारच्या बैठकीबाबत त्यांना निरोप धाडण्यात आला नसल्याचे सुत्रांनी सांगितले. तर पहिल्याच दिवशी मुहूर्त असल्याने जगताप यांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली दिली. जिल्हा बँकेत जगताप लढत राहणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाचे कारण पुढे करत स्वतःचा अजेंडा राबवणे गैर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात...