Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात 8 लाख 22 हजार नागरीकांचे लसीकरण

जिल्ह्यात 8 लाख 22 हजार नागरीकांचे लसीकरण

नाशिक। प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. आज दिवसभरात दोन्ही मिळून 7 हजार 568 जणांना डोस देण्यात आले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 8 लाख 64 हजार 781 जणांना लस देण्यात आली. दरम्यान कोव्हॅक्सीन हे केवळ 45 वर्षांवरील दुसरा डोस बाकी असणारांना देण्यास सुरूवात झाल्याने ते इतरांना नाकारण्यात आले आहे…

- Advertisement -

शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. शहर तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 64 हजार 781 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसींचा अपुरा साठा असल्याने पुन्हा एकदा लसीकरणावर याचा परिणाम होत आहे. दरम्यान सोमवारी दिवसभरात दोन्ही मिळून 7 हजार 568 जणांना लस देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली पंधरा दिवसांपासून लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद होती. नाशिक महापालिकेच्या 9 तर जिल्हाभरातील 70 अशा एकुण 79 केंद्रांवर लसीकरण सुरू होते. यामुळे आज दिवसभरात जिल्ह्यात 5 हजार 548 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 840, ग्रामिण जिल्ह्यात 4 हजार 417, मालेगाव 181 असे लसीकरण झाले आहे. तर 2 हजार 18 जणांना दुसरा डोस देण्यात आला. 45 व 60 वर्षांवरील पुर्वी एक डोस घेलेल्यांचा कालावधी पुर्ण झालेल्यांसाठी लस उपलब्ध व्हावी म्हणुन 18 ते 44 वयोगटांतील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतचे लसीकरण

विभाग पहिला डोस दुसरा डोस एकुण

शासकीय कर्मचारी 1,29,261 60,020 1,84,970

45 ते 60 वयोगट 2,80,605 61,958 3,20,263

60 वर्षावरील 2,43,740 75,031 3,02,090

18 वर्षावरील 14, 313 123 14,436

एकुण डोस 6,67,949 1,97,132 8,21,759

- Advertisment -

ताज्या बातम्या