Monday, May 20, 2024
Homeजळगावकेळी विम्याची भरपाई न मिळाल्याने 800 शेतकरी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत

केळी विम्याची भरपाई न मिळाल्याने 800 शेतकरी ऐन दिवाळीत आंदोलनाच्या तयारीत

रावेर Raver|प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी (Farmers) घेतलेल्या पीक विमा योजनेतील (Crop Insurance Scheme) नुकसान भरपाई (compensation for damages) ८०० शेतकऱ्यांना मिळाली  नसल्याने (Not received) शेतकरी संतप्त झाले आहे. याबाबत तहसीलदार (Tehsildar) यांना शेतकऱ्यांनी निवेदन (statement) दिले आहे. तत्काळ भरपाई न मिळाल्यास ऐन दिवाळीत शेतकरी आंदोलन (Diwali agitation) करण्याच्या पवित्र्यात आहे. 

- Advertisement -

राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे केळीपिक विमा योजनेत  मंजूर रक्कम खात्यात न आलेल्या शेतकऱ्यांची बैठक श्रमसाधना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात घेण्यात आली.यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बैठकीत विमा कंपनी व बँकेच्या होणाऱ्या त्रासाबद्दल अडचणींचा पाढा वाचला. त्यानंतर तहसील कार्यलयात जाऊन शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार  संजय तायडे यांना निवेदन दिले.यावेळी सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात न पडल्यास ऐन दिवाळीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिप सदस्य  रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य  दिपक पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाअ ध्यक्ष  सुनील कोंडे, रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, पं. स. सदस्य योगेश पाटील, शेख इम्रान  यांसह शेतकरी धीरज भंगाळे, गोपाळ भिरुड, रामभाऊ सोनवणे, रामदास भंगाळे, स्वप्नील चौधरी, राहुल राणे, वामन खाचणे, अनिल पाटील, रामकृष्णा सरोदे, गोपाळ चौधरी, आत्माराम पाटील, वैभव चौधरी, विशाल नेहेते, भास्कर पाटील, प्रकाश तायडे, काशिनाथ पाटील, ईसा पटेल, शे रफिक, रोशन खाचणे, अर्जुन पाटील, डिगंबर कुंभार, अनिल पाटील, दिलीप सरोदे, दिलीप सोनवणे यांसह तालुकाभरातून असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

यावेळी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीला बोलावून यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात येईल व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे नायब तहसीलदार श्री. तायडे यांनी सांगितले.

आठवडाभरात विमा रक्कम न आल्यास ऐन दिवाळीत तीव्र आंदोलन विविध अडचणींना सामोरे जात शेतकरी या विमा कंपनीस सर्व माहिती देत आहेत मात्र २५ दिवस उलटून ही रक्कम खात्यात नसल्याने शेतकरी बँकेच्या चकरा मारून त्रस्त झाले आहेत.आठवडाभरात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात न आल्यास ऐन दिवाळीत सणाच्या दिवशीच आम्ही आंदोलन करू.

सुनील कोंडे, तालुकाध्यक्ष ,राष्ट्रवादी ओबीसी सेल, रावेर तालुका.

 विमा कंपनीतर्फे एकदिवसीय कॅम्पची गरज-आमच्या खात्याची सर्व कागदपत्रे,अर्ज आम्ही विमा कंपनीला पुन्हा दिली आहेत.मात्र या समस्येच्या निवरणासाठी विमा कंपनी प्रतिनिधींनी एकदिवसीय कॅम्प लावून आमच्या अडचणी सोडवाव्यात. बँक आणि विमा कार्यलयाच्या चकरा मारून आम्ही त्रस्त झालो आहोत.

.धीरज भंगाळे, केळी उत्पादक शेतकरी, निंभोरा.

- Advertisment -

ताज्या बातम्या