Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ८६ हजारांवर

नाशिक जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा ८६ हजारांवर

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रसार सुरूच आहे. मागील आठवडाभरात हे प्रमाण कमी होत आहे. मात्र मंगळवारी यामध्ये पुन्हा थोडी वाढ झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

मागील चोवीस तासात 605 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे करोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा आकडा 86 हजार 609 वर पोहचला आहे.

मागील आठ दिवसात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 605 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

यामध्ये नाशिक शहरातील 530 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 57 हजार 797 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 155 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 24 हजार 198 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 16 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 3 हजार 989 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 625 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 484 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 77 हजार 469 वर पोहचला आहे.

करोनामृत्यूमध्येही आज वाढ झाली असून दिवसभरात 14 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामीण भागातील 7 तर मालेगाव येथील एका रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 547 इतका झाला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला आहे. दिवसभरात केवळ 842 नवे संशयित दाखल झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 86,609

* नाशिक : 57,797

* मालेगाव : 3,989

* उर्वरित जिल्हा : 24,198

* जिल्हा बाह्य : 625

* एकूण मृत्यू 1,547

* करोनामुक्त : 77,469

- Advertisment -

ताज्या बातम्या