Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशशॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा जागीच मृत्यू

शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अमेरिकेतील टेक्सासमधील डॅलसजवळील (Texas Dallas) एका बंदुकधाऱ्यांने शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) घुसून गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या गोळीबारात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे, तर गोळीबारात सातजण जखमी झाले असून स्थानिक वेळेनुसार ३.४० वाजता हा गोळीबार झाला. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन या हल्लेखोरास कंठस्नान घातल्याचे सांगितले जात आहे.

मोचा चक्रीवादळाचे सावट; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

टेक्सासच्या मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. एलन येथील एलन प्रीमियम आऊटलेट्स मॉलमध्ये शनिवारी ही घटना घडली. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोराचा शोध सुरू केला. त्यानंतर तेथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून तो मृतदेह हल्लेखोराचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Manipur violence : मणिपूरमध्ये हिंसाचाराचे ५४ बळी, राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी

दरम्यान, या हल्ल्यानंतर पोलिसांनी या परिसरात जाण्यास नागरिकांना मज्जाव केला आहे. तसेच या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओत गोळीबार सुरू होताच लोक मॉलमध्ये घाबरून पळताना दिसत आहेत. लोक शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये आश्रय घेताना दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडला गोळीबाराचे मोठमोठे आवाज ऐकायला येत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या