Thursday, May 2, 2024
Homeनाशिकधान्य चोरीप्रकरणी ९ जणांना अटक

धान्य चोरीप्रकरणी ९ जणांना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

धान्याची चोरी (theft of grain) केल्याप्रकरणी पुरवठा विभागाने कठोर पावले उचलले आहे. याबाबत गेल्या तीन वर्षात २६ रेशन दुकानदारांवर (ration shopkeepers) गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये नऊ रेशन दुकानदारांना अटकदेखील करण्यात आली आहे….

- Advertisement -

कोरोनाच्या (Corona) संसर्गामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या (Central and State Government) योजनेंतर्गत सध्या रेशनकार्डधारकांना मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे.

या वितरणाची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर देण्यात आलेली आहे. मात्र, काही या ठिकाणी कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत पुरवठा विभागाकडे दुकानदारांविरूद्ध नियमबाह्य कामकाज होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यात मागील तीन वर्षात ११० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. याबाबत पुरवठा विभागाने ८ हजार १८८ दुकानांची तपासणी केल्या. त्यात ८३३ दुकानात किरकोळ दोष आढळले. तर ५१ दुकानात धान्य वाटपात गंभीर दोष आढळले.

याप्रकरणी पुरवठा विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यात २० दुकानदारांना निलंबित करण्यात आले तर ४४ दुकानांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले. या दुकानदारांकडून एक लाख ४१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. २६ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून नऊ दुकानदारांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या