Friday, May 3, 2024
Homeनगरप्रसिद्धीसाठी कोण हपापलेले हे जनतेला माहीत- विजय वहाडणे

प्रसिद्धीसाठी कोण हपापलेले हे जनतेला माहीत- विजय वहाडणे

कोपरगाव (प्रतिनिधी) – नगराध्यक्ष व आमदार प्रसिद्धीला हपापलेले आहेत असा आरोप करणार्‍या उपनगराध्यक्षांचा यात काहीच दोष नाही. संजीवनीवर तयार होऊन आलेल्या बातमीवर त्यांचे फक्त नाव असते. याआधी नगरपरिषदेची निवडणूक होण्यापूर्वी कुठलाही कार्यादेश नसताना श्री. व सौ.कोल्हे यांनी घाईघाईने वाचनालय इमारत, नगरपरिषद कार्यालय व जिजामाता उद्यान या तीनही कामांचे भूमिपूजन व कोनशीला लावण्याचे काम केले. त्या कोनशीला बनविण्याचे काम करणार्‍यास अजूनही बिल दिले गेले नाही.सध्या होत असलेल्या विकास कामांचे भूमिपूजन केले तर नगराध्यक्ष व आमदारांना प्रसिद्धीची हौस आहे असे हास्यास्पद आरोप करायचे अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.

नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, मी आजपर्यंत एकदाही माझ्या फोटोचा फ्लेक्स बोर्ड लावू दिलेला नाही. लावलेले फ्लेक्स काढायला लावला. बहुसंख्य वेळा ध्वजारोहण करण्याची, भूमिपूजन, उद्घाटन करण्याची दुसर्‍यांनाच संधी दिली.

- Advertisement -

कोल्हे तर करोना रुग्णांना पुरण पोळ्या वाटतानाचेही फोटो काढून प्रसिद्धी मिळवितात. पुरण पोळ्याही संजीवनीच्याच खर्चाने. तुम्ही सुरू केलेल्या कोविड सेंटरबद्दल अभिनंदन. खरे तर कोल्हे यांनी नगरसेवकांचा वापर करून कशा प्रकारचे डावपेच नगरपरिषदेत केले हे जनतेला साडेचार वर्षात चांगलेच अनुभवास आले आहे. मी नगरसेवकांना दोष देणार नाही. कारण येणार्‍या नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी संजीवनीचा आदेश पाळावाच लागतो. केवळ काही नगरसेवकच नव्हे तर अजून 4-5 भाटही याच कामासाठी पोसलेले आहेत. महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीच्या फ्लेक्सवरही पति पत्नीचे फोटो का असतात? फ्लेक्सचा खर्चही शेतकरी सभासदांच्या संजीवनीतूनच भागविला जातो? असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या