Friday, May 3, 2024
Homeनगरलोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फलक बसवला

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फलक बसवला

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

लहुजी सेना व मातंग समाजाच्यावतीने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन नगरपंचायतने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाचा आकर्षक फलक त्या ठिकाणी बसवून बहुजन समाजाची अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल लहुजी सेनेच्या वतीने नगर पंचायत ला धन्यवाद दिले आहेत.

- Advertisement -

अनेक वर्षांपासून शिर्डी नगरपंचायतच्या मालकीच्या असलेल्या भाजी मार्केट कॉम्प्लेक्सचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावाने लावलेला फलक खराब झाल्याने त्या ठिकाणी डिजिटल फलक लावावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून लहुजी सेना व मातंग समाजाच्यावतीने शिर्डी नगरपंचायतला वेळोवेळी लेखी निवेदने देऊन मागणी केली होती मात्र गेल्या दोन वर्षांपासून या मागणीचा शिर्डी नगरपंचायत चालढकलपणा करत होती.

यामुळे येत्या मंगळवारी डिजिटल फलक न लावल्यास लहुजी सेनेच्यावतीने नगर पंचायत कार्यालयासमोर सामाजिक अंतर ठेवून उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा लहुजी सेनेचे कार्याध्यक्ष समीर वीर व अन्य पदाधिकार्‍यांनी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांना याबाबतचे निवेदन दोन दिवसांपूर्वी दिले होते.

यावेळी कार्याध्यक्ष समीर वीर, शिवा उमाप, दिपक साळवे, ज्ञानेश्वर पवळे, रामभाऊ पिंगळे, प्रकाश घोडे आदींनी सहभाग घेतला होताण गेली दोन वर्षांपासून आकर्षक डिजिटल बोर्ड लावण्याची मागणी शिर्डी नगर पंचायतने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षात पूर्ण केली म्हणून लहुजी सेना व समाजाच्या वतीने मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते व सर्व नगरसेवक यांचा लवकरच नागरी सत्कार समाजाच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती समीर वीर व रामभाऊ पिंगळे यांनी दिली आहे.

दैनिक सार्वमतमुळे बहुजन समाजाला मिळाला न्याय

गेली दोन वर्षापासून शिर्डी नगरपंचायतने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा आकर्षक डिजिटल फलक लावावा म्हणून बहुजन समाजाची मागणी सार्वमत वर्तमानपत्रातून वेळोवेळी प्रसिद्धी करून अखेर शिर्डी नगरपंचायतने अण्णाभाऊ साठेंचा सुंदर व आकर्षक फलक लावल्याने या कार्याचे श्रेय खरे दैनिक सार्वमतला असून बहुजन समाजाने दैनिक सार्वमतला धन्यवाद दिले आहेत.

सुशोभिकरणाच्या नावाखाली सर्कल होऊ देणार नाही- पिंगळे

कोपरगाव येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सुशोभीकरणाच्या नावाखाली पुतळ्याजवळ सर्कल करून कोपरगाव नगर पालिका रडीचा डाव खेळत आहे. हा प्रकार बहुजन समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार असून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा लहुजी सेनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा लहुजी सेना महाराष्ट्र सरचिटणीस रामभाऊ पिंगळे, परशुराम साळवे, कार्याध्यक्ष समीर वीर, भाऊसाहेब आव्हाड यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या