Friday, May 3, 2024
Homeजळगावशेतकरी हिताचा कायदा करण्याचा आग्रह

शेतकरी हिताचा कायदा करण्याचा आग्रह

जळगाव – Jalgaon :

शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभे राहून कृषी केंद्रीय कायद्याला विरोध करणारा शेतकरी हिताचा कायदा करावा या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कमिटी प्रमुख सदस्य प्रतिभाताई शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस,शिवसेना नेत्यांची भेट घेवून चर्चा केली.तसेच निवेदन दिले.

- Advertisement -

अलीकडेच महाराष्ट्र सरकारने राज्याच्या कृषी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या येत्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यातील सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कमिटी प्रमुख सदस्य प्रतिभाताई शिंदे यांनी भूमिका व अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आ. विजयाताई चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून चर्चा केली.

नेत्यांना दिले निवेदन

शेतकरी कष्टकरी ह्यांच्या हितासाठी ह्या कायद्यात सुधारणा आवश्यक आहेत .व त्या तातडीने होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त करून सुधारणा कोणत्या असाव्यात ह्या बाबत काही ठोस प्रस्ताव सादर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि निवेदन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या