Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशपासपाेर्टशी लसीकरण प्रमाणपत्र असे करा लिंक

पासपाेर्टशी लसीकरण प्रमाणपत्र असे करा लिंक

नवी दिल्ली

अनेक देशांनी त्यांच्या देशात प्रवाशासाठी लसीकरण प्रमाणपत्र (vaccination certificate) सक्तीचे केले आहे. परदेशात शिक्षणसाठी किंवा इतर कामानिमित्त जाणाऱ्या प्रत्येकाला कोरोनाची लस बंधनकारक करण्यात आली आहे. लस घेतल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र (vaccination certificates) सोबत असणे गरजेचे आहे. तसचे ते प्रमाणपत्र तुमच्या पासपोर्टशीही जोडून घेतलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया की पासपोर्टला लसीकरणाचे प्रमाणपत्र कसं लिंक करावे.

- Advertisement -

पासपाेर्टशी लिंक कसे करता येईल?

काेविनच्या www.cowin.gov.in या अधिकृत पाेर्टलवर जा. तुमचा माेबाइल क्रमांक (mobile number) टाकून लाॅगिन करा. ‘रेझ ऍन इश्यू’ पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर पासपाेर्ट (passport) पर्यायावर क्लिक करा. ज्या व्यक्तीचे प्रमाणपत्र लिंक (link) करायचे अाहे ते ड्राॅप-डाऊन मेनूमधून निवडा. आपल्या पासपाेर्ट क्रमांकाची (passport number) नाेंदणी करा आणि तपशील भरून सबमिट करा. काही सेकंदातच तुम्हाला नवीन प्रमाणपत्र (certificates) मिळेल.

जर पासपोर्ट आणि कोरोना लसीकरण प्रमाणपत्रातील तपशील जुळत नसतील तर तिथे एडीटचाही ऑप्शन देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया तुमची माहिती कशी एडीट करायची.

प्रमाणपत्रावर माहिती अपडेट कशी करावी ?

तुमचे लसीकरण प्रमाणपत्र (vaccination certificates) अाणि पासपाेर्टची माहिती जुळत नसेल तर तुम्ही लसीकरण प्रमाणपत्राच्या तपशीलामध्ये सुधारणाही करू शकता. त्यासाठी www.cowin.gov.in वर जा. तुमचा माेबाइल क्रमांक टाकून लाॅगिन करा. रेझ अॅन इश्यूवर क्लिक करा. नंतर प्रमाणपत्र सुधारण पर्यायावर (Correction in certificate’ ) क्लिक करा अाणि जाे तपशील बदलायचा अाहे ताे ड्राॅपडाऊन मेन्यूमधून निवडा. जी माहिती अपडेट करायची अाहे, त्याचा पर्याय निवडा अाणि तपशीलात सुधारणा करून सबमिट करा.

वैयक्तिक माहिती कितीवेळा अपडेट करता येते ?

काेविन पाेर्टलवर तुम्हाला नाव वा अन्य तपशीलात सुधारणा करण्याची सुविधा फक्त एकदाच मिळेल.

काेणत्या गाेष्टी लक्षात ठेवण्याची गरज अाहे ?

सगळ्यात अाधी तुमचा पासपाेर्ट व काेविड लसीकरण पत्रातील नाव यात फरक नकाे, नाही तर पाेर्टलवर नाेंद हाेणार नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी लसीकरणाची नाेंद करतानाच पासपाेर्टवर लिहिलेल्या नावाचीच नाेंद करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या