Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकच्या उद्योजकांनी विकसित केले 'व्हेंटिलेटर'

नाशिकच्या उद्योजकांनी विकसित केले ‘व्हेंटिलेटर’

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

कोरोनाकाळात (Covid-19) जाणवलेला व्हेंटिलेटरचा तुटवडा लक्षात घेत नाशिकच्या दोन उद्योगांनी एकत्र येत अत्याधुनिक व्हेंटिलेटर (Ventilator) विकसित केले आहे. मात्र याचे उत्पादन सुरू करण्यासाठी संबंधित वैद्यकीय खात्याची परवानगी अद्याप मिळाली नसल्याने प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे…

- Advertisement -

केव्हीआय कंट्रोल सिस्टिम्सचे संचालक निवृत्त कर्नल सारंग काशिकर (Sarang Kashikar) आणि दीप डिझाइन्सचे यश सांगवे (Yash Sangave) यांनी एकत्र येत संयुक्तपणे इंडिजिनस व्हेंटिलेटर विकसित करण्यास सुरुवात केली.

मार्च २०२१ पर्यंत हे डिझाइन पूर्णत्वास आणून ‘वायूदूत’ या नावाने व्हेंटिलेटर तयार केले. रुग्णाला श्वासोच्छवासासाठी आधार देणारे हे उत्पादन या दोन अभियंत्यांनी विकसित केले आहे.

मात्र रुग्णांसाठी तांत्रिक बाबी तपासण्याबाबत व्हेंटिलेटरच्या डिझायनिंगमध्ये इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन तसेच योग्य वैद्यकीय तज्ज्ञ किंवा बायोमेडिकल इंजिनिअर्सच्या मदतीची आवश्यकता आहे.

त्यानंतर याला केंद्र सरकारच्या (Central Government) मेडिकल इक्विपमेंट विभागाच्या (Department of Medical Equipment) अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्यानंतरच उत्पादन सुरू केले जाणार आहे. अद्याप व्हेंटिलेटरची किंमत ठरविलेली नाही. जास्त प्रमाणात उत्पादन केल्यास किमती कमी होण्यास मदत होईल.

हे व्हेंटिलेटर फोर बार एअर आणि फोर बार ऑक्सिजनवर काम करते. सध्याच्या स्थितीत ते व्हॉल्यूम कंट्रोल मोड, प्रेशर कंट्रोल मोड, असिस्ट व्हॉल्यूम कंट्रोल मोड, असिस्ट प्रेशर कंट्रोल मोड, एसआयएमव्ही (पी अॅण्ड व्ही) आणि प्रेशर सपोर्ट मोड अशा विविध मोडवर चालते. या यंत्रामध्ये सीपॅप, बायपॅप आणि एचएफएनसी हे अप्रमाणित मोड उपलब्ध आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या