Sunday, May 5, 2024
Homeजळगावदेशदूत वारीचे अभंग...

देशदूत वारीचे अभंग…

भक्तवत्सल विठ्ठल

भक्तवत्सल विठ्ठल :

- Advertisement -

गाऊ किती तुझी,

थोरवी विठ्ठला.

किती तू राबला,

भक्तांसाठी.

एकनाथा घरी,

श्रीखंड्या तू झाला.

बहिण बनला,

चोखाघरी.

नामदेवासंगे,

भोजन चाखिले.

अभंग राखीले,

तुकोबांचे.

जनाबाईचे तू,

ओढलं रे जातं.

अंतरीचं नातं,

सखूसंगे.

भना म्हणे देवा,

उध्दारीले भक्त.

हृदयात लुप्त,

कान्होपात्रा.

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

- Advertisment -

ताज्या बातम्या