Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता : लसीकरणासाठी पहाटे चार वाजेपासूनच नागरिकांच्या रांगा

राहाता : लसीकरणासाठी पहाटे चार वाजेपासूनच नागरिकांच्या रांगा

राहाता (वार्ताहर) / Rahata – करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिक पहाटे 4 वाजेपासून राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी करतात. लसीचा पुरवठा कमी असल्याने दररोज लस घेण्याकरिता जवळपास तिनशे नागरीक पहाटे चार वाजेपासून राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात टोकन मिळण्यासाठी रांगेत अनेक तास उभे राहत असल्याचे चित्र आहे.

परंतु जितका साठा उपलब्ध आहे तेवढेच टोकन प्रथम रांगेत येणार्‍या नागरिकांना दिले जाते. परिणामी ज्यांना टोकन मिळाली नाही त्यांना पुन्हा दुसर्‍या दिवशी लसीकरणासाठी पहाटेच रांगेत घेऊन उभे राहुल टोकन मिळेल की नाही याची प्रतीक्षा करावी लागते.

- Advertisement -

लसीचा पुरवठा कमी असल्याने अनेक लस लाभार्थ्यांना दुसरा डोस शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दिवस होऊनही मिळत नाही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना संपूर्ण दिवस काम करून दररोज पहाटे रुग्णालयात घेऊन लसीकरणासाठी होणार्‍या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

नागरिकांनी लस घेण्याकरिता पहाटे येण्याची गरज नाही. त्यासाठी सकाळी सात वाजता यावे रुग्णालयाने सुरू केलेल्या टोकन पद्धतीमुळे नागरिकांना त्रास होत नाही. बाहेर गावातील नागरिक रुग्णालयात येऊन गोंधळ घालतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो. लस डोस संख्या जशी उपलब्ध होईल त्याप्रमाणे सर्व लस लाभार्थ्यांना मिळणार आहे. विनाकारण नागरिकांनी गर्दी करू नये.

– डॉ. गोकुळ घोगरे,अधिक्षक़, राहाता ग्रामीण रुग्णालय.

मला कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन 95 दिवस झाले तरी दुसरा डोस, अद्याप मिळाला नाही. राहाता शहरात लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे लाभार्थ्यांना दुसरा डोस नियमापेक्षा जास्त कालावधी होऊनही मिळत नाही.

– मुन्ना सदाफळ, लस लाभार्थी राहाता

- Advertisment -

ताज्या बातम्या