Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रदहावीचा निकाल जाहीर; कशी असेल अकरावी प्रवेशाची प्रक्रिया? जाणून घ्या

दहावीचा निकाल जाहीर; कशी असेल अकरावी प्रवेशाची प्रक्रिया? जाणून घ्या

मुंबई | Mumbai

करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या (Corona Second Wave) प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या (Maharashtra SSC Exam) परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे.

- Advertisement -

अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीच्या परिक्षेचा निकाल लावण्यात आला आहे. दहावीचा विक्रमी निकाल असून ९९.९५ टक्के इतका आहे. यंदाही दहावीच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९९.९६ टक्के इतकी आहे. मुलांची टक्केवारी ९९.९४ टक्के असून राज्यातील २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

दरम्यान दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची अकरावी प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक CET परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

SSC result दहावीत सर्वच विद्यार्थी पास, असा पाहा तुमचा निकाल

अकरावी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा (CET Exam) एसएससी बोर्ड (SSC Borad), सीबीएसई (CBSC), सीआयएससीई (CISCE) आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नाही. परंतु अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना CET मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.

तसेच दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना CET साठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार नाही. एसएससी बोर्ड वगळता इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र शुल्क भरावे लागणार आहे.

कशी असेल सीईटी (CET) परीक्षा?

CET परीक्षा SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असून १०० गुणांची परीक्षा असेल. OMR पद्धतीने परीक्षा होणार असून दोन तासांची परीक्षा असेल. इंग्रजी (English), गणित (Mathematics), विज्ञान (Science), सामाजिकशास्त्र (Sociology) या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. परीक्षा केंद्रांची यादी एसएससी बोर्ड किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.

अकरावी प्रवेशाचे निकष काय?

CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. CET परीक्षा देणाऱ्यांना ११ वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य असणार असून त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर CET न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता १० वीच्या पद्धतीनुसार होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या