Friday, May 3, 2024
HomeUncategorizedभारीच! 'या' अ‍ॅपद्वारे विद्यार्थी करू शकणार नद्यांचा अभ्यास

भारीच! ‘या’ अ‍ॅपद्वारे विद्यार्थी करू शकणार नद्यांचा अभ्यास

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्यास पूजा उत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी ‘नदी को जानो’ (Nadi ko Jano) मोबाइल अ‍ॅप लॉन्च केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताच्या नद्यांबाबत माहिती (Information about the rivers of India) मिळणार आहे…

- Advertisement -

यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टीने फायदा होणार आहे. व्यास पूजा महोत्सव डॉ. सच्चिदानंद जोशी आणि भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

शिक्षकांनी (Teachers) भारताच्या सशक्तीकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भविष्यातील पिढ्यांना ज्ञान देण्याची भारतीय परंपरा हजारो वर्षांपासून जिवंत आहे. भारतीय शिक्षण मंडळ हा एक सूत्र आहे, जे आपल्याला वर्तमान आणि भविष्याशी जोडणार आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

प्रधान पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे विज्ञान वेगाने बदलत आहे. परंतु या वैज्ञानिक नवकल्पनांचा आधार म्हणजे आपल्यात राहणारी आत्म-जागरूकता होय. भारत देश एका नव्या युगात प्रवेश करत आहे. नवीन शिक्षण निती, विज्ञान, तंत्रज्ञान, सर्जनशील विचारसरणी, तार्किक निर्णय व नवनिर्मितीमुळे देशाचा विकास अधिक चांगला होणार आहे.

‘नदी को जानो’ या अ‍ॅपचा उद्देश संपूर्ण भारतभरातील नद्यांविषयी माहिती संकलित करणे आहे. पुनरुत्थान फाऊंडेशनच्या (punarutthan foundation) भारतीय नद्यांचा डेटाबेस तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम संशोधनाचा एक भाग आहे. या अ‍ॅपमध्ये भारतातील नद्यांविषयी सखोल माहिती मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना (Students) नदीशी संबंधित कोणतीही माहिती या अ‍ॅपवर अपलोड करता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या