Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशPetrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली कपात, जाणून घ्या आजचा दर

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली कपात, जाणून घ्या आजचा दर

दिल्ली | Delhi

देशात एकीकडे करोनाचा (Corona) प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ (Fuel Price Hike) होत होती.

- Advertisement -

मात्र तब्बल महिनाभराच्या स्थिरतेनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचित कमी होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांत डिझेलच्या दरात चारवेळा तर पेट्रोलच्या दरात तिसऱ्यांदा कपात झाली आहे.

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्ही किंमतीत १५ पैशांची कपात करण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारी इंधनाच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. दुसरीकडे, रविवारी पेट्रोलच्या किंमतीत २० पैशांनी कपात करण्यात आली.

राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल १०१.४९ रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेलची किंमतही ८८.९२ रुपये प्रति लीटरवर आली आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल १०७.५२ रुपये प्रति लिटर खरेदी करता येते. तर डिझेलची किंमत ९६.४८ रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये (Chennai) एक लिटर पेट्रोलची किंमत ९९.२० रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ९३.५२ रुपये आहे. कोलकातामध्ये (Kolkata) पेट्रोलची किंमत १०१.८२ रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत ९१.९८ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या