Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथे मानाच्या गणपतींचे साध्या पद्धतीने विसर्जन

नंदुरबार येथे मानाच्या गणपतींचे साध्या पद्धतीने विसर्जन

नंदुरबार (nandurbar) प्रतिनिधी –

नंदुरबार शहरातील मानाच्या श्रीमंत दादा गणपती, श्रीमंत बाबा गणपती, भाऊ, तात्या, काका, मामा, या मानाच्या गणपतींची साध्या पद्धतीने शहरातील सोनी विहिरीत (Sony wells) विसर्जन करण्यात आले.

- Advertisement -

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यापुर्वीपासूनच नंदुरबारातील मानाचे श्री दादा आणि श्री बाबा गणपतीची परंपरा सुरु आहे. यंदा श्रीमंत दादा गणपतीचे हे १३९ वे तर श्रीमंत बाबा गणपतीचे १३८ वे वर्ष होते. यासह नंदुरबारात मानाचे भाऊ, तात्या, काका, मामा अशा गणपतींची स्थापना करण्यात आली होती. नंदुरबारातील श्रीमंत दादा व बाबा गणपतीची हरिहर भेट हे एक वेगळे आकर्षण असते. गेल्या १३७ वर्षापासून हरिहर भेटीची परंपरा कायम होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी नियोजीत वेळेत दोन्ही मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येते.

श्री दादा गणपतीची मिरवणूक नियोजीत मार्गावरुन जळकाबाजार परिसरात येते, तोपर्यंत श्री बाबा गणपतीची मिरवणूक एकाच परिसरात असते. रात्री ९ च्या सुमारास जळकाबाजार परिसरात दोन्ही गणपती एकमेकांसमोर येतात. तेथेच हरिहर भेट व्हायची मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने काही नियमावली जाहिर केली आहे. त्यानुसार यंदा ही श्री दादा व श्री बाबा गणपती यांची हरिहर भेट झाली नाही.

वाजंत्री वीणा साध्या पद्धतीने या मानाच्या श्रीमंत दादा गणपती, श्रीमंत बाबा गणपतीचे यासह भाऊ, तात्या, काका, मामा, या मानाच्या गणपतींची सध्या पद्धतीने शहरातील सोनी विहिरीत विसर्जन करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकूण ७६५ मंडळांकडून गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गेल्या १० दिवसांपासून मुक्कामाला असणाऱ्या गणरायाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी मोठी मंडळे सज्ज होती अंतिम टप्यात १७४ मंडळांकडून निरोप देण्यात आले यामध्ये सार्वजनिक १११, खासगी ५३ तर एक गाव एक गणपती १० अशा १७४ मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस दलातर्फे मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या