Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशथोडा दिलासा! देशात दैनंदिन करोना रुग्णांमध्ये घट, उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली

थोडा दिलासा! देशात दैनंदिन करोना रुग्णांमध्ये घट, उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असला तरी दैनंदिन रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २६ हजार ११५ करोनाबाधित आढळले असून २५२ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ०९ हजार ५७५ वर पोहोचली आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३५ लाख ०४ हजार ५३४ इतकी झाली असून आतापर्यंत ३ कोटी २७ लाख ४९ हजार ५७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ३८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरुच आहे. काल राज्यामध्ये २ हजार ५८३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली तर ३ हजार ८३६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ४० हजार ७२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्के आहे. राज्यात सध्या ४१ हजार ६७२ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या