Friday, May 3, 2024
Homeजळगावपंचायतराज समितीने घेतला अपहार, ग्रामसेवक तक्रारी आणि ई टेंडरिंग कारवाई अहवालाचा आढावा

पंचायतराज समितीने घेतला अपहार, ग्रामसेवक तक्रारी आणि ई टेंडरिंग कारवाई अहवालाचा आढावा

रावेर Raver|प्रतिनिधी-

ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) इ टेंडरिंगबाबत (tendering) दोषींवर कारवाईचा (Action on the culprits) अहवाल अद्याप दाखल झालेला नसल्याने,ह्या अहवालाच्या अनुषंगाने काय कारवाई निश्चित केली, याबाबत जिल्हा परिषदेत विचारणा करत,योग्यरित्या दखल घेऊन दोषींवर (Action on the culprits)कारवाई होईल असे मत पंचायतराज समिती सदस्य तथा अमळनेर आमदार अनिल पाटील (Amalner MLA Anil Patil) यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

- Advertisement -

पंचायत समितीत झालेल्या आढाव्यानंतर पंचायतराज समिती सदस्य डॉ देवराज होळी,अनिल पाटील,माधवराव जवळगांवकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी ई टेंडरिंग मुद्दा, ग्रामसेवक तक्रारी,अपहार झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याबाबत देखील गटविकास अधिकारी यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल उद्या बुधवार संध्याकाळ पर्यन्त मागवला आहे.तसेच तालुक्यात राबवण्यात आलेल्या जलमिशन अभियानअंतर्गत पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधी निधी वाया गेला त्याबाबत देखील पाणीपुरवठा विभागाकडून माहिती मागवली असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले आहे.

दरम्यान पंचायतराज समितीच्या स्वागताची जय्यत तयारी पंचायत समितीत करण्यात आली होती,रेडकार्पेट, रांगोळी, रंगरंगोटी आणि फुलांची सजावट करून पंचायत समिती सजवण्यात आली होती.तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रची पाहणी,पाल येथे भोजन आणि भेटी देत रावेरात उशिराने दाखल झालेल्या पंचायतराज समिती सदस्यांच्या स्वागतात निळ निशाण संघटनेच्यावतीने व्यक्तिगत लाभाच्या योजनेत गैरव्यवहार असल्याबाबतचे निवेदन आनंद बाविस्कर व सहकाऱ्यांनी सुपूर्द केले

यानंतर सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे,गटनेते पी.के.महाजन, पंचायत समिती सदस्य जितू पाटील,योगेश पाटील,दीपक पाटील,या सदस्यांनी पंचायतराज समिती सदस्य असलेल्या आमदारांचे गुलाब पुष्पगुच्छ देत स्वागत केले.पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत पंचायतराज समितीच्या सदस्यांनी २८ मुद्यावर विविध विभागाचा आढावा घेतला.

शिक्षण विभाग रडारवर कारवाईचे संकेतगटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा अनादर प्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत पंचायतराज समिती सदस्यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे निवेदन पावसाने झालेले कपाशी नुकसान,केळीवरील रोगराई प्रकरणी शेतकऱ्यांना भरपाई मिळावी याबाबतचे निवेदन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी दिले,यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन,पंकज वाघ,पंचायत समिती सदस्य योगेश पाटील,पांडुरंग पाटील,अतुल पाटील,शेख मेहमूद,कुणाल महाले उपस्थित होते. तर माजी जिप सदस्य रमेश पाटील,पंचायत समिती सदस्य दीपक पाटील,योगेश पाटील,सचिन पाटील,सरपंच संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष गणेश महाजन,प्रणित महाजन यांनी पंचायत समितीत पंचायत राज समिती सदस्यांचा सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या