Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्या...तेव्हा महाराष्ट्राने भाजपाला वेडी ठरवलं; कुटुंबीयांवरील छाप्यांवरून शरद पवारांचा खोचक टोला

…तेव्हा महाराष्ट्राने भाजपाला वेडी ठरवलं; कुटुंबीयांवरील छाप्यांवरून शरद पवारांचा खोचक टोला

मुंबई | Mumbai

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित कारखान्यावर आयकर विभागाने छापा (incom tax raid on ajit pawar relatives) टाकला आहे. जरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार शुगर या कारखान्यावर कारवाई सुरू आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकार (Modi govt) व भाजपावर (BJP) खोचक शब्दांत टीका केली आहे.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले, अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणात मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं मी कधी पद घेतलं नाही आणि असं असताना मला ईडीची (ED) नोटीस पाठवली. मला ईडीची नोटीस दिली, मला त्यांनी ईडीची नोटीस दिली आणि संपूर्ण महाराष्ट्राने भाजपला वेडी ठरवली असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

तसेच वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार असल्याचंही शरद पवार म्हणाले. त्यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतीप्रधान देशात शेतकऱ्याची परिस्थिती खालावली. मात्र, सरकारने शेतकऱ्यांना मदत पोहोचवली नाही. उलट शांत मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप सरकारने गाड्या घातल्या. असं ते म्हणाले.

महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढं कधी झुकला नाही आणि यापुढंही झुकणार नाही

दरम्यान या प्रकरणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे की, अजितदादांचे नातेवाईक हे माझे सुद्धा नातेवाईक आहेत. दादा आणि आम्ही वेगळे नाही. आमचं कुटुंब एकच आहे आणि संघर्ष ही पवार कुटुंबाची खासियत आहे. दिल्लीनं कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढं कधी झुकला नाही आणि यापुढंही झुकणार नाही, असं सुळे म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या