Friday, May 3, 2024
Homeनगरचित्रकार रवी भागवत यांच्या तीन चित्रांची निवड

चित्रकार रवी भागवत यांच्या तीन चित्रांची निवड

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुपच्या ‘कार्टून्स कट्टा’च्यावतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी चित्र व अर्कचित्रांचे ‘आमचेही फटकारे’ हे प्रदर्शन पुणे येथील बालगंधर्व कलादालनात सुरू होत आहे. निवड समितीने श्रीरामपूर येथील चित्रकार रवी भागवत याच्या तीन चित्रांची निवड या प्रदर्शनासाठी केली असल्याची माहिती संयोजक चित्रकार घनश्याम देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

देशभरातील शंभरहून अधिक चित्रकार व व्यंगचित्रकारांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनास आज बुधवार दि. 17 पासून सुरूवात होत असून तीन दिवस दररोज सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. देशभरातील ज्येष्ठ व तरुण चित्रकार व व्यंगचित्रकारांनी आपापल्या चित्र शैलीतून शिवसेना प्रमुखांचे चित्र रेखाटून त्यांना मानवंदना दिली आहे. तीन दिवस निमंत्रित चित्रकार आपल्या फटकार्‍यांतून रसिकांसमोर प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.

सर्वश्री वासुदेव कामथ, राज ठाकरे, प्रमोद कांबळे, बिजय बिस्वाल, घनश्याम देशमुख आदी मान्यवर चित्रकारांसह येथील चित्रकार रवी भागवत यांच्या तीन चित्रांची निवड या प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. भागवत यांनी त्यांचे गुरू चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल माध्यमात बाळासाहेब ठाकरे यांची 12 इंच बाय 18 इंच या आकाराची तीन चित्रे साकारली आहेत. ठाकरे यांच्या वयातील तीन टप्प्यांतील चित्रे भागवत यांनी साकारली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या