Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशConstitution Day 2021 : जाणून घ्या भारतीय संविधानाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

Constitution Day 2021 : जाणून घ्या भारतीय संविधानाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

देशभरात आज संविधान दिवस (Constitution Day 2021 ) साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तान देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे. या निमित्तानं जाणून घेऊयात संविधानाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी.

संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- Advertisement -

संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने १८ दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

कसं लिहीलं गेलं संविधान?

आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती.

संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या