Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी : मिळणार हा लाभ

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी : मिळणार हा लाभ

एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees)नवीन वेतनवाढ ( New pay hike)लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन हे नवीन वेतनवाढीनुसार मिळणार आहे. परंतु जे कर्मचारी कर्तव्यावर आहेत, त्यांनाच नवीन वेतनवाढ ( New pay hike) मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू…

- Advertisement -

महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि १० वर्षांच्या कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. १० ते २० वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ४,००० रुपयांची पगारवाढ, तसेच २० वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना २ हजार ५००० रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे. याशिवाय २८ टक्के महागाई भत्ताही देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या सात तारखेला होते.

एसटी कर्मचारी आंदोलनावरही अजित पवार बोलले

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या लांबलेल्या संपावर देखील भाष्य केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत असून याचा एसटी कर्मचाऱ्यांनी विचार केला पाहिजे असे पवार म्हणाले. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केलेली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन हे तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या