Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

विधान परिषदेच्या Legislative Council नागपूर Nagapur आणि अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी मतदान होत आहे. या दोनपैकी अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघात Akola-Buldana-Washim constituency उत्कंठावर्धक लढत होत असून येथे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार आमने-सामने आहेत.

- Advertisement -

नागपूरमध्ये 15 मतदान केंद्रांवर 549 मतदार तर अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये 22 मतदान केंद्रांवर 817 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. आज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान होऊन या निवडणुकीची मतमोजणी 14 डिसेंबरला होऊन निकाल जाहीर केला जाईल.

भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणुका जाहीर केल्या होत्या. यापैकी मुंबईत शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह बिनविरोध निवडून आले आहेत.

कोल्हपुरमध्ये भाजप तर धुळ्यात काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने अनुक्रमे सतेज पाटील आणि अमरीश पटेल विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे आज नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. यापैकी नागपूरची जागा भाजपसाठी सुरक्षित मानली जात आहे.

नागपूरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला

दरम्यान, मतदानाला काही तास शिल्लक असताना काँग्रेसने गुरुवारी उशिरा नागपूर मतदारसंघात उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने येथे अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याआधी काँग्रेसने नागपूर महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारीचा शब्द मिळाल्यानंतर भोयर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, मतदानाच्या आदल्या रात्री काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला.

अशी असेल लढत

अकोला-बुलडाणा-वाशिम : गोपीकिसन बाजोरिया (शिवसेना) विरुद्ध वसंत खंडेलवाल (भाजप)

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) विरुद्ध मंगेश देशमुख (काँग्रेस पुरस्कृत अपक्ष )

- Advertisment -

ताज्या बातम्या