Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedकोरोनाचा कहर... मराठवाड्यात ६२९ पॉझिटिव्ह

कोरोनाचा कहर… मराठवाड्यात ६२९ पॉझिटिव्ह

औरंगाबाद – aurangabad

मागील काही दिवसांत (corona) कोरोनाचा आकडा अत्यंत कमी झाला असताना ओमायक्रॉनचा (Omycron) शिरकाव झाला. रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) ५ तर जालन्यात एक ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. दुसरीकडे, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. गेल्या २४ तासात आठ जिल्ह्यांत ६२९ रुग्ण सापडले. तर लातूर जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

रविवारी १०८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या मराठवाड्यात सध्या २२०२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यांचा विचार करता औरंगाबाद जिल्ह्यात २३४ रुग्ण सापडले. तर जालना ३५, परभणी ४६, हिंगोली ४, नांदेड १४७, लातूर १०८, उस्मानाबाद २३, बीडमध्ये ३२ रुग्ण सापडले. औरंगाबाद जिल्ह्यात ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यापाठोपाठ लातूरमध्ये २७, नांदेड व बीडमध्ये प्रत्येकी १० उस्मानाबाद ९, जालना, परभणीत प्रत्येकी ७ जणांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली.

सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण औरंगाबादेत : ॲक्टिव्ह रुग्णांचा विचार करता येथे ८५६ रुग्ण आहेत. लातूरमध्ये ४०१, उस्मानाबाद ३०६, परभणी २१०, नांदेड १४७, जालना १३१, बीडमध्ये ११५ तर हिंगोलीत सर्वात कमी ३६ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याचे अहवालातून स्पष्ट होते.

औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण २३४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ५० हजार ८६६ झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ६५८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या