Friday, May 3, 2024
Homeनगरसंशयित करोना रूग्णांवर परस्पर उपचार करू नका

संशयित करोना रूग्णांवर परस्पर उपचार करू नका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला माहिती न देता संशयित करोना रुग्णांवर परस्पर उपचार करणार्‍या व करोनाची लक्षणे असणार्‍या रुग्णांना चाचणी न करण्याचा सल्ला देणार्‍या अहमदनगर शहरातील खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

करोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनची सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आढळून येत असल्याने अनेक रुग्ण महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चाचणी करण्याऐवजी खासगी डॉक्टरांकडून औषधे घेऊन उपचार करीत आहेत. परंतु यातील संभाव्य करोना रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य व त्यांच्या संपर्कात येणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना करोनाची लागण होण्याची भीती आहे.

या पार्श्वभूमीवर मनापाच्यावतीने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यास तसेच छोटे नर्सिंग होम चालक-मालक यांनाही याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून करोना बाधित रुग्णांवर कोणते उपचार करावेत, अशा रूग्णांसाठी कार्यपद्धती काय असावी, या बाबतही मनपाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. करोना संदर्भातील चाचणी केल्यानंतर संबंधित रुग्णांची माहिती मनपाकडे उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या