Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याप्रख्यात कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन

प्रख्यात कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन

नवी दिल्ली | प्रतिनिधी Nashik

प्रख्यात कथ्थक नर्तक (Kathak Maestro) आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते….

- Advertisement -

काल मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाची माहिती दिली. (Pandit Birju Maharaj Passes Away)

लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा असे होते. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनऊत झाला होता. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गायक अदनान सामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली. बिरजू महाराज यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या