Friday, May 3, 2024
Homeनगरभगवतीपूरमध्ये कापूस चोरी करणार्‍या दोघांना अटक

भगवतीपूरमध्ये कापूस चोरी करणार्‍या दोघांना अटक

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

दीड महिन्यापूर्वी भगवतीपूर शिवारात गणेश वसंतराव सोमवंशी यांच्या शेतातील खोलीमध्ये साठवून ठेवलेला सहा क्विंटल कापूस चोरीस गेल्याची घटना घडली. पोलिसांच्या तपासाअंती यासंदर्भात कोल्हार भगवतीपूर येथील दोघांना अटक करण्यात आली. काल सोमवारी त्यांना राहाता न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

- Advertisement -

आदित्य विष्णू माळी (वय 20), महेश नामदेव वाघ (वय 20) दोघेही रा. अंबिकानगर, कोल्हार अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दि. 4 डिसेंबर 2021 रोजी रात्रीच्या सुमारास गणेश सोमवंशी रा. कोल्हार बुद्रुक यांच्या भगवतीपूर शिवारात सोनगाव रोडलगत असलेल्या शेतातील बंद खोलीमध्ये साठवून ठेवलेल्या कापसावर चोरट्यांनी डल्ला मारला. गोण्यांमध्ये भरून ठेवलेला साधारणतः 48 हजार रुपये किमतीचा सहा क्विंटल कापूस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. यासंदर्भात लोणी पोलीस ठाण्यामध्ये कापूस चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या अनुषंगाने चोरीचा तपास करताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वरील दोघांना ताब्यात घेतले. सदर चोरलेला कापूस या दोघांनी सोनगावच्या एका व्यापार्‍याला विकला होता. पोलिसांनी याबाबत खातरजमा केली आणि व्यापार्‍याकडून 230 किलो वजनाचा 15 हजार रुपये किमतीचा कापूस हस्तगत केला.

रविवार दि. 23 जानेवारी रोजी कोल्हार येथील अंबिकानगरमधून वरील दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना काल सोमवारी राहाता न्यायालयात हजर केले असता 14 दिवस न्यायालयीन कोठडी फर्माविण्यात आली. पुढील तपास लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र औटी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या