Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापुण्यात किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; शिवसैनिक आक्रमक

पुण्यात किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; शिवसैनिक आक्रमक

पुणे | Pune

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात पुण्यात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही शिवसैनिकांनी सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचादेखील प्रयत्न केला….

- Advertisement -

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या आज राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमय्या यांनी त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला.

काय म्हणाले सोमय्या?

संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांनी बनावट कंपनी निर्माण केली. मुंबईतील कोविड सेंटर्सचे (Covid Centers) कंत्राट मिळवले आणि १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा (Scam) केल्याचा गंभीर आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केलेला आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स, मुलंड, दहिसर, वरळी येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीचे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे.

संजय राऊतांच्या मित्रांकडून १०० कोटींचा कोविड घोटाळा; सोमय्यांचा बॉम्ब

दरम्यान, आज तक्रार दाखल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला जात असताना सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या