Friday, May 3, 2024
Homeनाशिकज्येष्ठांसाठी घरपोच लसीकरण- महापौर सतिश कुलकर्णी

ज्येष्ठांसाठी घरपोच लसीकरण- महापौर सतिश कुलकर्णी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ज्या नागरिकांना शारीरिक व्याधी (physical ailments )व इतर कारणास्तव लसीकरण केंद्रांवर ( Vaccination Centers )जाणे शक्य नसेल अशा नागरिकांनी नाशिक महापालिकेस संपर्क केल्यास मनपा सेवक घरपोच लसीकरणासाठी ( Vaccination at Home )येतील. करोनाच्या Corona तिसर्‍या लाटेचा सामना लसीकरणाच्या जोरावरच आपण करत आहोत. नाशिक शहरातील 75 टक्के नागरिकांनी लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केले आहेत. मात्र शहर करोनामुक्त करण्यासाठी 100 टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. म्हणून स्वतःला व आपल्या शहराला करोनामुक्त करण्यासाठी ज्या नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नसेल त्यांनी त्वरित घ्यावा, असे आवाहन नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी ( Mayor Satish Kulkarni ) यांनी केले आहे.

- Advertisement -

मागील सुमारे दोन वर्षे करोनाकाळात नागरिकांची जीवनशैली कठोर नियमांमुळे बदलून गेली आहे. त्यामुळे मोकळेपणा नागरिकांच्या वाटेला आलेला नाही. ही परिस्थिती काही नागरिकांच्या लसीकरणाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली आहे. यास्तव करोनाच्या तिसर्‍या लाटेत पुन्हा नियमांची सक्ती नागरिकांवर करण्याची वेळ आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावरदेखील विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.

नागरिकांवर लादण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक नियमांमुळे जीवनातील मोकळेपणा हरवलेला आहे. पुन्हा मोकळेपणाने सुरक्षित जीवनमान जगावयाचे असेल तर नागरिकांनी लसीकरण पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष न करता नाशिक महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरणाचा दुसरा डोस त्वरित घ्यावा. ज्या नागरिकांना शारीरिक व्याधी व इतर कारणास्तव लसीकरण केंद्रांवर जाणे शक्य नसेल अशा नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेस संपर्क साधला तर मनपा सेवकांमार्फत घरपोच लसीकरणाची सेवा पुरवण्यात येईल, असे महापौर कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाने निर्देशित केल्यानुसार ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेणे गरजेचे आहे. नियमांच्या बंधनात किती दिवस राहायचे हे नागरिकांनी स्वतःच ठरवावे. दरम्यान, नाशिक शहरातील सर्व नगरसेवकांनी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी Vaccination Awarness पुढाकार घ्यावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या