Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजोड्याने मारेन म्हणणाऱ्या संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे उत्तर, आता कुणाला जोडे मारणार?

जोड्याने मारेन म्हणणाऱ्या संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे उत्तर, आता कुणाला जोडे मारणार?

नवी दिल्ली| New Delhi

ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) भरत आहेत तेच बंगले चोरीला कसे गेले असा सवाल आज दिल्लीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे….

- Advertisement -

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. राऊत यांनी भाजप नेते सोमय्या, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि भाजयुमोचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर आरोप केले. सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्यांच्या निकॉन प्रकल्पात पीएमसी बँक घोटाळ्याचा पैसै वापरला गेल्याचा आरोप त्यांनी केला होता.

यानंतर आज दिल्लीत किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरली आहे. 2008 मध्ये व्हिजीट करून घरे बांधून झाली.

तुम्ही एग्रीमेन्ट 2014 मध्ये केले आहे. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हे 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरे चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 31 मार्च 2021 पर्यंत अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे, मनीषा वायकर कर भरत आहेत. याचा अर्थ जागा केव्हा घेतली रश्मी आणि मनिषा यांनी 2013 मध्ये एमओयू केले.

जेव्हा वायकर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. रश्मी आणि मनीषा यांच्यातर्फे 30 जाने 2019 रोजी घरपट्टी त्यांच्या नावे करण्याचा अर्ज आला आहे.

राऊत म्हणतात, घरे नसतील तर सोमय्यांना जोडे हाणू तर आता ही माहिती समोर आल्यानंतर जोडे नेमके कुणाला हाणायचे असे सांगत सोमय्या यांनी पायातली चप्पलचा पत्रकार परिषदेत दाखवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या