Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedपुढील दीड आठवडा 'पावसाचा'

पुढील दीड आठवडा ‘पावसाचा’

औरंगाबाद – aurangabad

हवामानातील (Weather) अनपेक्षित बदलामुळे ७ ते १८ मार्च दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व अवकाळी पाऊस (rain) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, (onion) कांदा, द्राक्ष (grape), आंबा (mango) मोहर आदी फळ पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. तर पावसाच्या शिडकाव्याने उन्हाच्या काहिलीपासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

ला निनाचा प्राभाव, हिंद महासागर, अरबी समुद्र, (Bengal) बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे हवामानात वेगात व अनपेक्षित बदल होत आहेत. फेब्रुवारी अखेर थंडी कमी होऊन उन्हाळा ऋतूस सुरुवात झाली. कमाल तापमान ३५ अंशांवर उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले होते. तापमान वाढीमुळे बाष्पीभवन वेगात झाले. उत्तरेतील शीत वारे खेचून आणण्यासाठी पोषक ठरले. समुद्रावरून बाष्प मोठ्या प्रमाणावर वाहून येत आहेत. कमी हवेचा दाब निर्माण झाला आहे. वातावरणातील घटकांचा आकाशात संगम होऊन ढग घोंगावत आहेत. यामुळे ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील.

विजेच्या कडकडाटासह पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. त्यानुसार ७ ते १८ मार्च दरम्यान औरंगाबादसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जेथे पोषक वातावरण असेल तेथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्त भागातील तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सियसने कमी राहिल्यामुळे हवेचे दाब वाढतात. याला ला निना असे म्हणतात. तर दुसरे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील भूपृष्ठ पाण्याचे तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंश सेल्सियसने वाढले आहे. या दोन्ही कारणांमुळे हवेचे दाब व चक्राकार वारे वाढतात. ढग तयार होऊन भारताच्या भूपृष्ठाकडे येऊन पाऊस पडतो. सध्या समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या