Friday, May 3, 2024
Homeराजकीयविधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर निर्णय घ्या - काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर निर्णय घ्या – काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Election of Assembly Speaker )अडथळे आणून ही निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करत असलेल्या भाजप आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून मोठी चपराक दिली आहे.

- Advertisement -

न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी आतातरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या विषयावर लवकर निर्णय घ्यावी अशी आमची विनंती असल्याची प्रतिक्रिया काँँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole ) यांनी बुधवारी दिली.

भाजप (BJP )जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे काम करत आहे. कुठलातरी कायदा पुढे करुन न्यायालयात याचिका दाखल केली जात आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत १२ लाख रुपयेही जप्त करुन मोठी चपराक दिली आहे. भाजपने आतातरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक न्यायालयात जायचे आणि चांगले काम सुरू आहे त्याला आव्हान द्यायचे काम भाजपने बंद करावे, असे पटोले यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्प (State Legislature’s budget )११ तारखेला सादर केला जाणार आहे. त्याआधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी, अशी आमची इच्छा आहे. अशोक चव्हाण, अनिल परब, अजित पवार यांनी राज्यपाल महोदय यांची काल भेटही घेतली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी आणि राज्यपाल त्यादृष्टीने निर्णय घेतील असा आमचा विश्वास आहे, असेही पटोले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या