Friday, May 3, 2024
Homeनगर...त्यामुळे आमदार, खासदार नसल्याचे रडगाणे बंद करा - ना. गुलाबराव पाटील

…त्यामुळे आमदार, खासदार नसल्याचे रडगाणे बंद करा – ना. गुलाबराव पाटील

पारनेर |प्रतिनिधी|Parner

पारनेर (Parner) हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असून आगामी निवडणुकीत (Election) आम्हाला हे दाखवून द्यायचे आहे. शिवसेना (Shivsena) पक्ष किंवा संघटना नाही तर विचार आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे आमचा आमदार (MLA), खासदार (MP) नाही हे रडगाणे बंद करा असे बोलत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची झाडाझडती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil) यांनी येथे घेतली.

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील (Parner Taluka) अळकुटी (Alkuti) येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh), विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे यांनी कार्यकर्ते समवेत शिवसेनेत प्रवेश केला.

पुढे बोलतांना मंत्री पाटील म्हणाले, कोरोना काळात शिवसेनेने (Shivsena) आदर्श काम केले आहे. परंतु प्रसिद्धी पासून दुर राहिलो आहे. पडलो तरी बदल्याची आग मनात असली पाहिजे. अडीच वर्षाचा कार्यकाळ विधानसभा निवडणुकीसाठी बाकी असल्याने व जिल्हा परिषद व बाजार समिती निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजेे. 46 पाणी पुरवठा पैकी 24 गावातील पाणी पुरवठादार योजना मंजूरी दिली आहे. त्यामुळे एक पुण्याचे काम करण्यासाठी हे खाते मिळाले आहे. महाराष्ट्रातील 27 हजार गावांना मला पाणी पाजायचे असून सरपंचांनी माझ्याकडे पाणी पुरवठा योजना प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.

मंत्री गडाख म्हणाले की, पारनेर तालुक्यातील शिवसेना नव्या विचारांने व जोमाने पेटलेला आहे. पारनेर तालुक्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे विशेष लक्ष आहे. 89 योजना नवीन महामंडळाच्या माध्यमातून केल्या जाणार असून पारनेर तालुक्यातील 162 बंधारे तलाव दुरुस्ती काम करणार आहे. एकही बंधारे दुरुस्ती राहणार नाही. परंतु ही कामे शेतकरी व सर्व सामान्य माणसा पर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे.

यांच्यासह संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, युवा सेना प्रमुख नितीन शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे, डॉ.भास्कर शिरोळे, संतोष येवले, निलेश खोडदे, शंकर नगरे, गवराम नवले, पंढरीनाथ उंडे, महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी, सरपंच डॉ.कोमल भंडारी, उपतालुकाप्रमुख सुनिता मुळे, संध्या शेळके, मनिषा सोमवंशी, सिमा गांगुर्डे, सुष्मा चौधरी, ताराबाई चौधरी, सुमन पावडे, शरद घोलप, नगरसेवक युवराज पठारे, सरपंच मनोज मुंगसे, उपसरपंच दत्तात्रय पवार, युवराज पाटील, राजु शेख, भाऊ ठुबे, नितीन औटी, शुभम देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

भोळेपणाचे राजकारण करू नका

माजी आमदार विजय औटी भोळ्ेपणाचे राजकारण करू नका. प्रत्येक पक्षात हा नवा जूना वाद चालू असतो. प्रत्येक गावाच्या वेशीवर शिवसेनेचा वाघ पाहिजे. पदे येथील व जातील परंतु सर्व सामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. शिवसेनेची पदवी ही जेल आहे. त्यामुळे आगामी सहामाही परिक्षेसाठी तयारीला लागा गटातुन एक नावच आले पाहिजे. यासाठी तयारी करा, असा ईशारा वजा सुचना पाटील यांनी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या